TRENDING:

T20 World Cup : इंग्लंड जिंकली, तरी सापळ्यात अडकली, सेमी फायनलला अंगावर घेतला सगळ्यात मोठा धोका!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलचं चित्र आता हळू हळू स्पष्ट व्हायला लागलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचल्या आहेत, तर उरलेल्या दोन जागांसाठी चार टीममध्ये रेस आहे.
advertisement
1/7
इंग्लंड जिंकली, तरी सापळ्यात अडकली, सेमी फायनलला अंगावर घेतला सगळ्यात मोठा धोका!
ग्रुप 1 मधून भारत किंवा वेस्ट इंडिज तर ग्रुप 2 मधून न्यूझीलंड किंवा पाकिस्तान या टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.
advertisement
2/7
शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला 64 ते 65 रननी विजय मिळवावा लागेल, किंवा श्रीलंकेचं आव्हान 13 ओव्हरमध्ये पार करावं लागेल, अन्यथा पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल आणि न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
3/7
दुसरीकडे टीम इंडियाला रविवारी वेस्ट इंडिजचा पराभव करावाच लागणार आहे. या सामन्यात विजय झाला तर टीम इंडिया सेमी फायनलला प्रवेश करेल, अन्यथा वेस्ट इंडिज ही ग्रुप-1 मधून सेमी फायनलला पोहोचणारी दुसरी टीम ठरेल.
advertisement
4/7
ग्रुप-2 मध्ये असलेल्या इंग्लंडने श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव करून सेमी फायनलमध्ये जागा मिळवली. खरंतर पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यावरच इंग्लंड सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झाली होती.
advertisement
5/7
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंड अडचणीत सापडली होती, पण त्यांनी विजय खेचून आणला. न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून इंग्लंडने टीम इंडिया किंवा वेस्ट इंडिज या विस्फोटक टीमचा धोका पत्करला आहे.
advertisement
6/7
ग्रुप-2 मधून इंग्लंड ही सेमी फायनलला पोहोचणारी टॉपची टीम ठरणार आहे. तर ग्रुप-1 मध्ये भारत किंवा वेस्ट इंडिज सेमी फायनलला पोहोचणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या टीम असू शकतात, त्यामुळे इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये सामना भारत किंवा वेस्ट इंडिजविरुद्ध होईल.
advertisement
7/7
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला सेमी फायनलमध्ये पाकिस्तान किंवा न्यूझीलंडविरुद्ध खेळावं लागेल. सेमी फायनलमध्ये विजय मिळवणाऱ्या टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : इंग्लंड जिंकली, तरी सापळ्यात अडकली, सेमी फायनलला अंगावर घेतला सगळ्यात मोठा धोका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल