मिळाालेल्या माहितीनुसार, २६ जाानेवारी रोजी सकाळी ८.३३ वाजेच्याा सुमारास वंदे भारत एक्स्प्रेस 22962 सुरतवरून मुंबईला येत होती. भेस्तान स्टेशनपासून जात असताना कोच C 16 च्या खिडकीवर कुणी तरी दगड फेकला असल्याचं समोर आलं. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने कारवाई सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
१२ वर्षीय मुलाने फेकला दगड
advertisement
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी भेस्तान स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून एका १२ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आलं. एएसआय रवी कुमार, हेड कॉन्स्टेबल जोगिंदर आणि कॉन्स्टेबल प्रदीप यांनी या मुलाला पकडलं. या मुलाची चौकशी केली असता त्यानेच दगड फेकल्याचं कबुल केलं., हाा मुलगा स्टेशनजवळ असलेल्या झोपडपट्टीत राहतो.
स्टेशनजवळ खेळत असताना चुकून वंदे भारत एक्स्प्रेसवर दगड फेकला, असल्याचं मुलाने साांगितलं. त्यानंतर त्याच्या वडिलांना बोलावण्यात आलं आणि घटनास्थळावर पोलिसांनी दोघांची साक्ष घेऊन पंचनामा केला. या मुलाला त्याच्या वडिलांसोबत पुढील चौकशीसाठी रेल्वे पोलिसांनी उधना इथं घेऊन गेले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
