advertisement

APMC Market : डाळिंबाच्या दरात उलथापालथ, आल्याला 9000 रुपये मिळाला भाव, द्राक्षाची काय स्थिती? Video

Last Updated:

राज्यातील मार्केटमध्ये दररोज शेतमालांच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतात. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहुयात.

+
News18

News18

सांगली: राज्यातील मार्केटमध्ये दररोज शेतमालांच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतात. शुक्रवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांचे अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, द्राक्ष आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहुयात.
आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2055 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 1057 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3500 ते 9000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल आल्यास 2500 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्षाची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 1636 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी सोलापूर बाजारात आवक झालेल्या 1233 क्विंटल द्राक्षास 100 ते 400 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 781 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 ते 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंब दराची लाली वाढली
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1301 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 887 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 15000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 14 क्विंटल डाळिंबास 13500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market : डाळिंबाच्या दरात उलथापालथ, आल्याला 9000 रुपये मिळाला भाव, द्राक्षाची काय स्थिती? Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement