Success Story : इंजिनिअर रमला गावात, 100 गीर गाईचे केलं संगोपन, कोट्यावधीची उलाढाल, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
महिन्याला लाखो रुपयांची दुग्ध जन्य पदार्थाची विक्री अन्, त्यातून आयुष्यला स्थिरता देणारी तरूण इंजिनिअरची ही कहाणी आहे.
जालना : एक इंजिनिअर तरुण, स्पेनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करतो. त्यानंतर नऊ कालवडी आणि एक गोऱ्हापासून गीर गाईंचे संगोपन करू लागतो. यात त्याला एवढा रस निर्माण होतो की, तो याला 100 गाईंपर्यंत वाढवतो. महिन्याला लाखो रुपयांच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री आणि त्यातून आयुष्याला स्थिरता देणाऱ्या तरुण इंजिनिअरची ही कहाणी आहे.
जालना जिल्ह्यातील राजूर येथील या तरुणाचे नाव मारोती पालोदे आहे. घरची परिस्थिती सधन असल्याने त्यांनी स्पेन या देशात आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनिअरिंग व्यवसायात नशीब आजमावून पाहिले. परंतु, घेतलेल्या एका निर्णयामुळे निराशेत जाण्याची वेळ आली. तेव्हा मात्र त्यांना गीर गाईंनी मानसिक स्थिरता दिली. गोसेवा माझ्या नशिबातच लिहिली होती, असे ते गमतीने सांगतात.
advertisement
सध्या त्यांच्याकडे 100 हून अधिक गीर गाई आहेत. त्यांच्या योग्य व्यवस्थापनातून त्यांना दररोज 300 ते 400 लिटर दूध मिळते. या दुधाची 80 रुपये लिटरने विक्री होते. शिल्लक राहिलेल्या दुधापासून तूप, बासुंदी, पनीर, पेढे, लस्सी असे दुग्धजन्य पदार्थ ते बनवतात. दररोज 10 ते 15 हजार व्यवस्थापनाचा खर्च होतो, तर 30 हजार रुपये मिळतात. असा रोज 10 ते 15 हजार रुपये निव्वळ नफा ते कमावतात. वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल ते करत आहेत.
advertisement
50 वर्षांच्या चवीची जपली परंपरा,150 पदार्थांचे फूड डेस्टिनेशन, तुम्हाला पुण्यातील हे ठिकाण माहितीये?
ब्रीडिंगसाठी ब्राझीलचे तंत्र
पालोदे यांच्या गोठ्यातील अनेक गाई या ब्राझील येथील वळूचे वीर्य वापरून तयार केल्या आहेत. गीर गाईची दूध देण्याची क्षमता त्यांनी 27 लिटरपर्यंत वाढवली आहे.
अनेक बक्षिसांची लयलूट
जालना येथे 2019 मध्ये झालेल्या पशुधन प्रदर्शनात त्यांच्या गाईने दुसरा क्रमांक मिळवला, तर शिर्डी येथे झालेल्या प्रदर्शनात राज्यात प्रथम त्यांची मनी नावाची गाय आली.
advertisement
गाईच्या शेण आणि गोमूत्र विक्रीतून कमाई
देशी वाणाच्या गाईच्या शेण आणि गोमूत्राचा वापर जीवामृत तयार करण्यासाठी होतो. अनेक फळ पिकांना जीवामृत फवारणी गरजेची असते. गीर गाईच्या गोमूत्र आणि शेण विक्रीतून देखील पालोदे यांना अधिकचे उत्पन्न मिळते.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 8:50 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : इंजिनिअर रमला गावात, 100 गीर गाईचे केलं संगोपन, कोट्यावधीची उलाढाल, Video








