advertisement

50 वर्षांच्या चवीची जपली परंपरा,150 पदार्थांचे फूड डेस्टिनेशन, तुम्हाला पुण्यातील हे ठिकाण माहितीये?

Last Updated:

1976 साली सीतल आहुजा यांनी केवळ छोट्याशा ज्यूस बारपासून सुरू केलेला हा प्रवास आज 150 हून अधिक पदार्थांचे फूड डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो.

+
News18

News18

पुणे : पुणे शहराची ओळख सांगणारी अनेक खाद्यस्थळे आजही खवय्यांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रभात रोडवरील दर्शन ज्यूस बार. यंदा या लोकप्रिय ठिकाणाने 50 वर्षांचा सुवर्णमहोत्सव साजरा करत यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. 1976 साली सीतल आहुजा यांनी केवळ छोट्याशा ज्यूस बारपासून सुरू केलेला हा प्रवास आज 150 हून अधिक पदार्थांचे फूड डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो.
सीतल आहुजा सांगतात की, मला खाण्याची खूप आवड होती आणि म्हणूनच या व्यवसायात यायचं ठरवलं. सुरुवातीला येथे फक्त ताजे फळांचे ज्यूस मिळत असत. त्या काळी मोसंबी ज्यूसची किंमत अवघी दोन रुपये होती. काळानुसार चवीत आणि दर्जात सातत्य राखत आज तोच ज्यूस 130 रुपयांना मिळतो, मात्र ग्राहकांचा विश्वास तसाच अबाधित आहे.
advertisement
ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन ज्यूसबरोबर काही खाण्याचे पदार्थ असावेत, या विचारातून सँडविचची सुरुवात झाली. त्यानंतर एकामागोमाग विविध स्नॅक्सची भर पडत गेली. चना भटूरा, दही वडा, कॅरमल कस्टर्ड यांसारखे पदार्थ ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले. जे बाहेर सहज उपलब्ध नाही, ते येथे देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे आहुजा सांगतात. सर्व पदार्थ नैसर्गिक पद्धतीने आणि गुणवत्तेशी तडजोड न करता तयार केले जातात, हीच दर्शनची ओळख बनली आहे.
advertisement
या व्यवसायामागे केवळ नफा हा उद्देश नव्हता, तर सामाजिक बांधिलकीही होती. त्या काळात कमवा आणि शिका सारख्या योजना फारशा उपलब्ध नव्हत्या. अनेक विद्यार्थी येथे पार्ट-टाइम काम करत शिक्षण पूर्ण करत असत. गेल्या पाच दशकांत सुमारे 100 ते 150 विद्यार्थ्यांनी येथे कामाचा अनुभव घेतला असून आज ते विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे दर्शन हा केवळ खाद्यव्यवसाय न राहता अनेक तरुणांच्या आयुष्याचा पाया ठरला आहे.
advertisement
दुसऱ्या पिढीतील कुणाल आणि विशाखा यांनी या परंपरेला आधुनिक व्यवस्थापनाची जोड दिली. 2018 मध्ये बाणेर येथे दुसरी शाखा सुरू करण्यात आली. नवीन पिढीच्या अपेक्षा ओळखून सेवा, सादरीकरण आणि व्यवस्थापनात बदल करण्यात आले, मात्र मूळ चव आणि गुणवत्ता कायम राखण्यात आली. प्रभात रोड आणि बाणेर या दोन्ही शाखांमधून आज वार्षिक सुमारे 1 कोटी रुपयांची उलाढाल होत असून जवळपास 100 हून अधिक कर्मचारी येथे कार्यरत आहेत.
advertisement
पन्नास वर्षांचा प्रवास पूर्ण करताना दर्शनने केवळ पदार्थांची संख्या वाढवली नाही, तर विश्वास, सचोटी आणि आपुलकीची परंपराही जपली आहे. बदलत्या काळात स्पर्धा वाढली असली, तरी सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि ग्राहकांशी जुळलेले नाते यामुळे दर्शन ज्यूस बार आजही पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरतो. सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील नव्या संकल्पनांचा संगम साधत दर्शनची चव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार संस्थापक आणि व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
50 वर्षांच्या चवीची जपली परंपरा,150 पदार्थांचे फूड डेस्टिनेशन, तुम्हाला पुण्यातील हे ठिकाण माहितीये?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement