advertisement

तोंडातून फेस अन्...सोलापुरात किराणा दुकानदारासह पत्नीचा संशयस्पद मृत्यू; चिमुरड्या मुलींचे छत्र हरपले, गूढ वाढलं

Last Updated:

कलावती परिसरातील एका घरा पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात शोककळा पसरली.

News18
News18
सोलापूर :  सोलापूर शहरातील कलावती नगर परिसरात मंगळवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. कलावती परिसरातील एका घरा पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात शोककळा पसरली. सोमनाथ धानोप्पा पाटील आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील अशी मृत पावलेल्या दांपत्याची नावे आहेत. दोघेही घरात तोंडातून फेस येत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची सखोल पाहणी करत पंचनामा केला असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे. पती-पत्नीने आत्महत्या केली की अन्य कोणते कारण आहे, याबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement

शेजाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं? 

सोमनाथ आणि श्रीदेवी पाटील हे दांपत्य आपल्या घराशेजारी किराणा दुकान चालवत होते. या दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कुक्कुटपालनाचा व्यवसायही सुरू केला होता. मात्र, या नव्या व्यवसायातून अपेक्षित लाभ न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला होता का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी तसेच कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती घेतली जात असून  नातेवाईक व शेजाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत.
advertisement

घटनेबद्दल तीव्र हळहळ

या दांपत्याला दोन मुली असून, आई-वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात मोठी गर्दी झाली असून, नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप समोर नाही

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू जप्त केल्या असून, तांत्रिक आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील चौकशीनंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमके सत्य समोर येणार आहे. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तोंडातून फेस अन्...सोलापुरात किराणा दुकानदारासह पत्नीचा संशयस्पद मृत्यू; चिमुरड्या मुलींचे छत्र हरपले, गूढ वाढलं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement