advertisement

Success Story : नोकरी सोडली, कंपनी उभारली! शुभम पत्तरवाळीतून वर्षाला कमावतो 8 लाख!

Last Updated:
शुभम शेळके या तरुणाने शेंद्रा परिसरात पत्तरवाळी, नाश्ता प्लेट्स आणि पेपर कप तयार करण्याचा व्यवसाय सुरू करून केवळ स्वतःपुरता नाही तर इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.
1/7
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथील एक तरुण स्वतःच्या जिद्दीवर उभा केलेला छोटेखानी उद्योग आज इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शुभम शेळके या तरुणाने शेंद्रा परिसरात पत्तरवाळी, नाश्ता प्लेट्स आणि पेपर कप तयार करण्याचा व्यवसाय सुरू करून केवळ स्वतःपुरता नाही तर इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

2/7
उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर शुभम खासगी कंपनीत नोकरी करत होता. मात्र, कायमस्वरूपी काहीतरी स्वतःचे उभे करावे, हा विचार त्याच्या मनात सतत घोळत होता. याच काळात मेटे (शुभमचे मामा) यांच्या मार्गदर्शनातून पत्तरवाळी निर्मितीचा व्यवसाय करण्याची कल्पना पुढे आली. बाजारातील वाढती मागणी आणि कमी भांडवलात सुरू होणारा उद्योग या दोन गोष्टी लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला.

3/7
या उद्योगात इलेक्ट्रिक रोलर मशीनचा वापर केला जातो. मशीनमध्ये आवश्यक त्या आकाराचा साचा बसवला जातो. त्यानंतर विशेष कागद किंवा साहित्य मशीनमध्ये टाकले की काही सेकंदांत तयार ताट्या, दोने किंवा कप बाहेर येतात. डिझाइन आणि आकारानुसार वेगवेगळे साचे वापरले जातात. कमी जागेत आणि मर्यादित मनुष्यबळात हा व्यवसाय चालवता येतो.

4/7
शुभम तयार केलेला माल किराणा दुकानदारांमार्फत तसेच लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, हरिनाम सप्ताह यांसारख्या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर विकला जातो. सध्या या उद्योगातून वर्षाकाठी सुमारे 7 ते 8 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. या माध्यमातून तीन जणांना थेट रोजगार मिळाला असून, शुभमचे आई-वडीलही त्याला हातभार लावत आहेत.

5/7
हा व्यवसाय योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून सुरू केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. सुरुवातीला अंदाजे दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक लागते.

6/7
मात्र, उद्योग सुरू करण्यापूर्वी संबंधित प्लांटला भेट देऊन प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घेणे, खर्च-नफा यांचा अभ्यास करणे आणि टप्प्याटप्प्याने सुरुवात करणे गरजेचे आहे.

7/7
स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर छोट्या उद्योगातूनही मोठी भरारी घेता येते, हे शुभम शेळके यांच्या उदाहरणातून स्पष्ट होते.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement