advertisement

Astrology: झालं बाबा.. गेली मोठी साडेसाती! धनशक्ती योग जुळल्याचा 3 राशींना अफाट फायदा

Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि आत्मविश्वासाचा स्वामी मानला जातो. जेव्हा मंगळ राशी बदलतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम माणसाच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि निर्णयक्षमतेवर होतो.
1/5
मराठी पंचांगानुसार, 23 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत आधीच शुक्र विराजमान असल्याने या दोन्ही ग्रहांच्या मिलाफातून धनशक्ती राजयोग निर्माण झाला आहे.
मराठी पंचांगानुसार, 23 फेब्रुवारी 2026 रोजी मंगळाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत आधीच शुक्र विराजमान असल्याने या दोन्ही ग्रहांच्या मिलाफातून धनशक्ती राजयोग निर्माण झाला आहे.
advertisement
2/5
या काळात मंगळाचा संबंध राहू, बुध आणि सूर्याशीही येत आहे, पण शुक्र-मंगळाची युती सर्वात जास्त फलदायी मानली जात आहे. हा राजयोग 2 मार्चपर्यंत टिकेल, कारण त्यानंतर शुक्र मीन राशीत जाईल. या अल्प काळात काही राशींच्या नशिबाचं दार उघडू शकतं.

3/5
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं रखडली होती, ती आता मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल, तर कामाचा विस्तार करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. गुंतवणुकीतून फायदा मिळण्याचेही चांगले संकेत आहेत.

4/5
मकर - मकर राशीच्या मंडळींना या काळात जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेले पैसे परत मिळाल्याने दिलासा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचे जे प्रश्न होते, ते सुटण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि वरिष्ठांची मदत मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येत असला तरी खर्चही वाढणार आहेत, त्यामुळे आर्थिक नियोजन विचारपूर्वक करा.

5/5
कुंभ - मंगळ तुमच्याच राशीत आल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ नवीन सुरुवातीचा आहे. विशेषतः जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. परदेशाशी संबंधित कामात किंवा परदेशी कंपनीत नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. एखादं नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करायचा असेल, तर 2 मार्चपर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
कुंभ - मंगळ तुमच्याच राशीत आल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ नवीन सुरुवातीचा आहे. विशेषतः जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात, त्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. परदेशाशी संबंधित कामात किंवा परदेशी कंपनीत नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. एखादं नवीन काम किंवा प्रकल्प सुरू करायचा असेल, तर 2 मार्चपर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement