advertisement

तमिळ सिनेसृष्टीत भूकंप! थलापथी विजयच्या संसाराला तडा? पत्नी संगीताने केले गंभीर आरोप!

Last Updated:

Vijay Sangeetha separation: थलापथी विजयच्या पत्नी संगीता यांनी चेंगलपट्टू न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला असून या घटनेमुळे तमिळ चित्रपटसृष्टी आणि राजकारणात खळबळ उडाली आहे.

News18
News18
चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या राजकीय पक्षाचा सर्वेसर्वा थलापथी विजय सध्या एका मोठ्या वैयक्तिक वादात अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या, त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. विजयची पत्नी संगीता हिने चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे. यामुळे केवळ सिनेसृष्टीच नाही, तर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

संगीताचे धक्कादायक आरोप

विजय आणि संगीता यांनी आजवर आपलं खासगी आयुष्य नेहमीच पडद्याआड ठेवलं होतं. मात्र, घटस्फोटाच्या अर्जात संगीताने विजयवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विजयचे सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा संगीताने केला आहे. एका 'आदर्श फॅमिली मॅन'ची प्रतिमा असलेल्या विजयसाठी हा आरोप त्याच्या सार्वजनिक प्रतिमेला मोठा धक्का देणारा ठरू शकतो.
advertisement

दोन वर्षांपासून राहत होते वेगळे

घटस्फोटाचा हा निर्णय अचानक घेतलेला नाही, असं अर्जातील माहितीवरून स्पष्ट होतंय. विजय आणि संगीता गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे समोर आले आहे. दीर्घकाळ चाललेला हा दुरावा आता कायदेशीर लढाईत रूपांतरित झाला असून, दोघांमधील संवाद पूर्णपणे संपल्याचे हे संकेत आहेत.
advertisement

२० एप्रिलला होणार पहिली सुनावणी!

चेंगलपट्टू कौटुंबिक कल्याण न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. न्यायालय सुरुवातीला तडजोडीचा प्रयत्न करेल की हे प्रकरण थेट घटस्फोटाकडे वळेल, याकडे तमिळनाडूच्या जनतेचे लक्ष लागले आहे. संगीता ही मूळची श्रीलंकन तमिळ असून, ती विजयची चाहती होती. १९९९ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले (जॅसन संजय आणि दिव्या साशा) आहेत.
advertisement

राजकीय भवितव्यावर काय परिणाम होणार?

विजयने नुकताच राजकारणात प्रवेश केला असून २०२६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी तो सज्ज झाला आहे. अशा वेळी वैयक्तिक आयुष्यातील हा वाद त्याच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम करू शकतो. विरोधकांकडून या मुद्द्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण सार्वजनिक आयुष्यात विश्वासार्हतेला मोठे महत्त्व असते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
तमिळ सिनेसृष्टीत भूकंप! थलापथी विजयच्या संसाराला तडा? पत्नी संगीताने केले गंभीर आरोप!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement