advertisement

Success Story : 25 हजार खर्च अन् दीड लाख नफा, शेतकऱ्याने केली फक्त 10 गुंठ्यात फायद्याची शेती, असं काय केलं?

Last Updated:
10 गुंठे शेतात त्यांनी लसणाची लागवड करून खर्च वजा करून 1 ते 1.50 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. त्यामुळे त्याचा प्रयोगाची चर्चा होत आहे.
1/5
शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी केला आहे.

2/5
10 गुंठे शेतात त्यांनी लसणाची लागवड करून खर्च वजा करून 1 ते 1.50 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. त्यामुळे त्याचा प्रयोगाची चर्चा होत आहे.
10 गुंठे शेतात त्यांनी लसणाची लागवड करून खर्च वजा करून 1 ते 1.50 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. त्यामुळे त्याचा प्रयोगाची चर्चा होत आहे.
advertisement
3/5
ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी नोव्हेंबर महिन्यात शेताची मशागत करून कोळशाची राख टाकली आणि लसणाची लागवड केली. लसणावर करपा आणि भुरी रोग होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी दोन-तीन वेळा फवारणी केली.

4/5
काढणीसाठी केवळ चार महिन्यांत लसूण आला. या लसणाच्या लागवडीसाठी त्यांना 25 हजार रुपयांचा खर्च आला असून, विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाने नफा उभा राहिला. हिप्परकर यांनी हा लसूण आठवडी बाजारात विक्री केला. यामुळे त्यांना अधिक भाव मिळाला आणि नफा वाढला.

5/5
ज्ञानेश्वर हिप्परकर सांगतात की, शेती परवडत नाही, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकाचे योग्य नियोजन करावे आणि बाजारात स्वतः विक्री करावी. असा प्रयोग केल्यास भरपूर उत्पन्न मिळेल. हिप्परकर यांचा हा यशस्वी प्रयोग सध्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कमी जमिनीतही योग्य नियोजनाद्वारे लाखो रुपये कमवता येतात, हे यातून स्पष्ट झाले आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement