advertisement

उदयपूरमध्ये थाटात लग्नसोहळा, आता हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शन; रश्मिका-विजयने सर्वांत आधी 'या' व्यक्तीला दिलं आमंत्रण

Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना काल, २६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले.
1/10
ज्या क्षणाची 'विरोश'चे चाहते गेली सात वर्षे चातकासारखी वाट पाहत होते, तो स्वप्नवत सोहळा अखेर उदयपूरच्या अरवली टेकड्यांमध्ये थाटामाटात पार पडला. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना काल, २६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले.

2/10
लग्नानंतर या जोडीने शेअर केलेले अधिकृत फोटो पाहून सोशल मीडियावर जणू अभिनंदनाचा पाऊस पडतोय. पण चर्चा रंगतेय ती या जोडीच्या राजेशाही आणि पारंपरिक वेडिंग लूकची.

3/10
विजय देवरकोंडाने आपल्या लग्नासाठी कोणत्याही मॉडर्न पेहरावाचा विचार न करता, अस्सल भारतीय परंपरेला पसंती दिली. विजयने शुभ्र पांढऱ्या रंगाची रेशमी धोती आणि त्यावर सिंदूरी रंगाचा शेला परिधान केला होता.

4/10
त्याच्या गळ्यातील जड सोन्याचा कासू हार, कमरेला असलेला सोन्याचा पट्टा आणि कानातील कुंडल यामुळे तो एखाद्या पौराणिक कथेतील राजपुत्रासारखा दिसत होता. विजयचा हा लूक हैदराबादच्या प्राचीन विणकाम कलेतून प्रेरित होता.

5/10
रश्मिकाने आपल्या लग्नात एकाच वेळी दोन संस्कृतींचा मान राखला. तेलगू विधींसाठी तिने डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केलेली रस्ट रंगाची भरजरी रेशमी साडी नेसली होती. या साडीवर पुरातन सोन्याच्या धाग्यांनी केलेलं नक्षीकाम सर्वांचे लक्ष वेधून घेत होतं.

6/10
मात्र, खरी चर्चा रंगली होती ती रश्मिकाच्या कोडावा लूकची. आपल्या मुळांशी नातं सांगणाऱ्या या पद्धतीत रश्मिकाने साडीच्या निऱ्या मागे खोचल्या होत्या. विशेष म्हणजे, ही कोडावा साडी तिला तिच्या सासूबाईंनी म्हणजेच विजयची आई, माधवी देवरकोंडा यांनी लग्नाचं लेणं म्हणून भेट दिली होती. डोक्यावर सोन्याचे दागिने आणि गळ्यात चोकर अशा साजाच रश्मिकाचं सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलून दिसत होतं.

7/10
लग्नाच्या फोटोंसोबतच या जोडप्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे फोटोही तुफान व्हायरल झाले आहेत. लग्नाआधीच या जोडीने दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या रिसेप्शनचं आमंत्रण दिलं होतं.

8/10
पंतप्रधानांनी पत्राद्वारे या जोडीला आशीर्वाद देताना म्हटलं की,
पंतप्रधानांनी पत्राद्वारे या जोडीला आशीर्वाद देताना म्हटलं की, "सिनेमात तुम्ही अनेक स्क्रिप्ट्स वाचल्या असतील, पण तुमच्या खऱ्या आयुष्यातील ही ईश्वराने लिहिलेली स्क्रिप्ट पडद्यावरील कोणत्याही मॅजिकपेक्षा भारी असेल!"
advertisement
9/10
विजयने लग्नाचे फोटो शेअर करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणतो,
विजयने लग्नाचे फोटो शेअर करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणतो, "एके दिवशी मला तिची इतकी आठवण आली की, मला जाणवलं तिच्याशिवाय माझा घासही घशाखाली उतरत नाहीये. मग ठरवलं, जी माझी बेस्ट फ्रेंड आहे, तिलाच माझी पत्नी बनवायचं!"
advertisement
10/10
तर रश्मिकाने विज्यूचे आभार मानत लिहिलं की,
तर रश्मिकाने विज्यूचे आभार मानत लिहिलं की, "तुझ्यामुळे मी आज एक खंबीर स्त्री बनू शकले आहे, आय लव्ह यू!"
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement