advertisement

महाराष्ट्रात 'अहो' तसं साऊथमध्ये नवऱ्याला बायको काय म्हणते, रश्मिका विजयला कशी हाक मारते?

Last Updated:
Rashmik Vijay South Indian Marriage : रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा यांच्यामुळे आता साऊथ इंडियन लग्नही चर्चेत आहे. त्यामुळे जसं महाराष्ट्रात नवऱ्याला बायका अहो म्हणतात तसं साऊथमध्ये काय म्हणतात माहिती आहे का?
1/7
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी साऊथ इंडियन पद्धतीने लग्न केलं. तेलुगु आणि कोडवा अशा दोन पद्धतीत त्यांचं लग्न झालं. रश्मिका-विजय यांचा लूक, त्यांचा थाट पाहून साऊथ इंडियन लग्नही चर्चेत आहे.

2/7
अशात जसं महाराष्ट्रात नवऱ्याला बायको नावाने हाक न मारता अहो म्हणते तसं  दक्षिण भारतात नवऱ्याला बायका काय म्हणतात, रश्मिका विजयला कोणत्या नावाने हाक मारते, तुम्हाला माहिती आहे का?

3/7
भारतीय परंपरेतच पत्नी पतीला नावाने नाही तर आदराने हाक मारते. मराठीत अहो ऐकता का, हिंदीत अजी सुनते हो अशी हाक मारली जाते. नवऱ्याचं नाव न घेण्याची ही परंपरा दक्षिण भारतातही आहे. पण ती राज्य, भाषा आणि कुटुंब परंपरेनुसार बदलते. 

4/7
माहितीनुसार तामिळनाडूत सामान्यपणे एन्ना, एंगा असं म्हटलं जातं किंवा अण्णाही म्हणतात. अण्णा म्हणजे मोठा भाऊ पण काही ठिकाणी हा शब्द नवऱ्यासाठीही वापरतात.

5/7
केरळमध्ये चेट्टा किंवा एट्टा म्हणतात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात नावानंतर अंडी हा आदरार्थी प्रत्यय लावतात. किंवा एमंडीही म्हणतात. 

6/7
रश्मिका कर्नाटकची आहे, जिथं री, एन्री, अवरू असं म्हणतात. तर विजय तेलंगणाचा आहे जिथं अंडी हा आदरार्थी प्रत्यय लावतात किंवा एमंडी म्हणतात. मग रश्मिका विजयला काय म्हणते? रश्मिकाने लग्नानंतर केलेल्या पोस्टमध्ये तिने विजयला विज्जू असं म्हटलं आहे. ती प्रेमाने त्याला अशीच हाक मारते. 

7/7
आता बदलत्या काळानुसार नवऱ्याला नावानेच हाक मारलं जातं. तर काही महिला कुटुंबात नवऱ्याच्या नावाऐवजी मुलांच्या नावासमोर बाबा जोडून हाक मारतात.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement