advertisement

Holi 2026 : 10 रुपयांत वस्तू घ्या 20 ला विका, होळीत करा फायद्याचा बिझनेस, मुंबईत हे आहे मार्केट

Last Updated:

रंग, पिचकारी, फुगे आणि विविध खेळण्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू झाली आहे. किरकोळ विक्रेते तसेच लहान व्यवसाय सुरू करू इच्छिणारे अनेक जण घाऊक दरात माल खरेदीसाठी येथे गर्दी करत आहेत.

+
मज्जिद

मज्जिद बंदर मार्केटमध्ये 10 रुपयांपासून पिचकारी आणी 5 रुपयांपासून रंग विक्री, छो

मुंबई : होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून मस्जिद बंदर परिसरातील बाजारपेठेत सणाची लगबग स्पष्टपणे जाणवत आहे. येथील जेबीसा मार्केटमध्ये रंग, पिचकारी, फुगे आणि विविध खेळण्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री सुरू झाली आहे. किरकोळ विक्रेते तसेच लहान व्यवसाय सुरू करू इच्छिणारे अनेक जण घाऊक दरात माल खरेदीसाठी येथे गर्दी करत आहेत.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार लहान प्लास्टिक पिचकारी अवघ्या 10 रुपयांपासून उपलब्ध आहे. या पिचकाऱ्यांचा घाऊक दर 120 रुपये डझन आहे. आकर्षक डिझाईनच्या पिचकाऱ्यांची किंमत सुमारे 50 रुपये असून कार्टून थीम असलेल्या पिचकाऱ्यांना मुलांकडून विशेष मागणी आहे. मोठ्या आकाराच्या पिचकाऱ्यांचे दर 30 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत आहेत. पाण्याची जास्त क्षमता असलेल्या आणि टँक असलेल्या पिचकाऱ्यांचे दर त्यानुसार वाढलेले दिसतात.
advertisement
रंगांच्या स्टॉलवरही ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हर्बल गुलाल 40 रुपये डझन दराने उपलब्ध आहे. पिंक रंग 60 रुपये डझन किंवा 5 रुपये नग या दराने विकला जात आहे. कॅप्सूल डब्बी रंग, 4 बुंद रंग तसेच कपड्यांवर मारल्यानंतर सहज निघून जाणारा छुमंतर रंगही बाजारात उपलब्ध आहे. सुरक्षित आणि त्वचेला हानी न पोहोचवणाऱ्या रंगांना यंदा अधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
advertisement
मज्जिद बंदरमधील घाऊक बाजार हा कमी भांडवलात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय मानला जातो. येथे स्वस्त दरात माल खरेदी करून परिसरात किरकोळ विक्री केल्यास चांगला नफा मिळू शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Holi 2026 : 10 रुपयांत वस्तू घ्या 20 ला विका, होळीत करा फायद्याचा बिझनेस, मुंबईत हे आहे मार्केट
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement