advertisement

स्त्रीबीज तस्करीचं 'ठाणे कनेक्शन' उघड! आलिशान इमारतीत सुरु होता आईच्या गर्भाशयाचा सौदा

Last Updated:

बदलापूर पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली असून त्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

thane egg trafficking Case
thane egg trafficking Case
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
ठाणे : बदलापूर स्त्रीबीज प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. ठाणे हे स्रीबीज तयार करण्याचे मुख्य केंद्र होते. ठाण्यातील गावदेवी परिसरातील राजहंस नावाच्या आलिशान इमारतीत अवैधरित्या स्रीबीज तयार करण्याचे काम सुरु होते, बदलापूर पोलिसांनी केलेल्या तपासात MALTI IVF ART BANK नावाने हे सेंटर सुरु होते. पोलिसांनी तपास केला तेव्हा या MALTI IVF ART BANK येथे महिलांना बोलावून त्यांच्या गर्भात अंडी तयार केली जायची आणि नंतर त्यांची विक्री केली जायची हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरु होता.
advertisement
अवैध स्त्रीबीज प्रकणाचे मुख्य काम ठाण्यात सुरु असायचे मात्र ज्या परवान्यावर हे सुरु होते ते नाशिक मधील एक मोठे IVF सेंटर आहे. त्यांच्या नावे ठाण्यात IVF BANK सेंटर उघडण्यात आले होते. या सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली असून नाशिक येथील IVF सेंटरला नोटीस धाडण्यात आली आहे.
advertisement

 पाच जणांना अटक

बदलापूर स्त्री बीज प्रकरणी पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर,मंजूषा वानखेडे आणि अश्विनी चाहुकस्वार यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या चौकशीतून ठाण्यात एका मालती हॅास्पिटलमध्ये अवैधरित्या स्रीबीज तयार केले जायचे याचा खुलासा झाला होता. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली असून त्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement

 काय आहे नाशिक कनेक्शन?

बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं,आता या प्रकरणातल नाशिक कनेक्शन देखील समोर आलं आहे. नाशिकच्या मुंबई नाक्यावर असलेल्या मालती IVF सेंटरची आणि हे सेंटर ज्यांच्या नावाने चालवलं जात होतं, त्या डॉ. वंदना पाटील आणि डॉ. अमोल पाटील यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहेय इतकच नाही तर या मालती IVF सेंटरला नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कायदेशीर नोटीसही बजावली आहे.
advertisement

नाशिकचं IVF सेंटर बंद

दरम्यान नाशिक पालिका प्रशासनाने केलेल्या या कारवाई बाबत मालती IVF सेंटरच्या डॉ बाजूही न्यूज 18 मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नाशिकच्या या मुंबई नाक्यावरील मालती IVF सेंटर बंद असल्याचं आढळून आलं. त्यामुळे IVF सेंटरच्या डॉक्टरची बाजू समोर येऊ शकली नाही मात्र दररोज सुरू असणार हे सेंटर आज अचानक बंद ठेवण्यात आल्याने संशय निर्माण झाला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्त्रीबीज तस्करीचं 'ठाणे कनेक्शन' उघड! आलिशान इमारतीत सुरु होता आईच्या गर्भाशयाचा सौदा
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement