advertisement

Healthy Breakfast : मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी परफेक्ट! बनवा झटपट बीट आणि कडधान्यांचं थालीपीठ

Last Updated:

Healthy lunchbox Recipe : मुलांना आपल्याला भाज्या आणि कडधान्यंही खाऊ घालायच्या असतात. अशावेळी मुलांसाठी तुम्ही हे खास बीटरूट आणि कडधान्यांचे थालीपीठ बनवू शकता. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे.

बीटरूट आणि कडधान्यांच्या थालीपीठाची रेसिपी
बीटरूट आणि कडधान्यांच्या थालीपीठाची रेसिपी
मुंबई : मुलांच्या डब्यासाठी आपण बऱ्याचदा झटपट बनणाऱ्या रेसिपीज शोधत असतो. त्यात मुलांना आपल्याला भाज्या आणि कडधान्यंही खाऊ घालायच्या असतात. अशावेळी मुलांसाठी तुम्ही हे खास बीटरूट आणि कडधान्यांचे थालीपीठ बनवू शकता. ही रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही हे थालीपीठ नाश्त्यासाठीही बनवू शकता. याला जास्त वेळ लागणार नाही.
ही बीटरूट आणि कडधान्यांच्या थालीपीठाची रेसिपी modern_mage_cooks या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला तर मग वेळ न दवडता पाहूया हेल्दी आणि टेस्टी बीटरूट- कडधान्याचे थालीपीठ कसे बनवायचे.
हेल्दी थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
- 2 कप मोड आलेली कडधान्ये
- 1 कांदा
- 2 हिरवी मिरची
- मूठभर धणे
- 1 बीट
advertisement
- चवीनुसार मीठ
- 2 चमचे जिरे पावडर
- 1 लिंबू
- 3 चमचे पांढरे तीळ
- 1 ते 1.5 कप बाजरीचे पीठ
- मळण्यासाठी पाणी
- ऑलिव्ह ऑइल किंवा तूप
हेल्दी थालीपीठ बनवण्याची पद्धत..
- चॉपर किंवा ग्राइंडरमध्ये मोड आलेली कडधान्ये घ्या. त्यामध्ये मिरच्या, कांदा आणि कोथिंबीर टाकून ते बारीक करून घ्या.
advertisement
- एका ताटात हे मिश्रण घ्या. त्यामध्ये किसलेले बीट, जिरे पावडर, तीळ, मीठ, लिंबू आणि बाजरीचे पीठ घाला.
- थोडे थोडे पाणी घालून याची मऊसूत सैलसर कणिक तयार करा.
- आता एक रॅपिंग पेपर घ्या. त्याला थोडे तेल लावा आणि कणकेचा छोटासा गोळा घ्या.
- हा गोळा रॅपिंग पेपरवर ठेऊन हाताने हलके हलके थालीपीठ थापून घ्या.
advertisement
- थापून झाल्यानंतर गरम तव्यावर टाकून हे थालीपीठ भाजा.
- हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
advertisement
तुम्ही हे थालीपीठ व्हाईट बटर, दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता. हे थालीपीठ चवीला तर अप्रतिम लागतेच शिवाय तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. हे तुम्ही मुलांच्या डब्यातही देऊ शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Healthy Breakfast : मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी परफेक्ट! बनवा झटपट बीट आणि कडधान्यांचं थालीपीठ
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement