advertisement

Breakup नंतर मुली आणखी सुंदर का दिसू लागतात? हा कोणताही चमत्कार नाही, तर 'रिव्हेंज ड्रेसिंग'चा खेळ

Last Updated:
तुम्ही हे अनेकदा अनुभवलं असेल आणि यामागे काय कारण आहे? असा विचार करणारे तुम्ही असाल तर हे लक्षात घ्या की हा कोणताही जादूचा प्रयोग नाही. मानसशास्त्राच्या भाषेत याला 'रिव्हेंज ड्रेसिंग' (Revenge Dressing) असं म्हणतात.
1/8
आयुष्यात कधी ना कधी तरी आपण ब्रेकअपच्या त्या कठीण टप्प्यातून जातो. अशा वेळी मन उदास असतं, कशातच लक्ष लागत नाही आणि सतत त्याच जुन्या आठवणी छळत असतात. पण, अशातच तुम्ही तुमच्या 'एक्स' पार्टनरला पाहता तेव्हा चे नक्कीच आश्चर्यचकीत करतं. खास करुन महिलां किंवा मुलींच्या बाबतीत हे घडतं. ब्रेकअपनंतर मुली नवीन हेअरकट, स्टायलिश कपडे आणि चेहऱ्यावर एक कमालीचा आत्मविश्वासात दिसतात. अशामुळे मुलं अनेकदा कन्फ्यूज होतात की अरे ही तर माझ्यासोबत असताना ही अशी नव्हती मग आता इतकी सुंदर आणि कॉन्फिडंट कशी काय दिसू लागली?

2/8
तुम्ही हे अनेकदा अनुभवलं असेल आणि यामागे काय कारण आहे? असा विचार करणारे तुम्ही असाल तर हे लक्षात घ्या की हा कोणताही जादूचा प्रयोग नाही. मानसशास्त्राच्या भाषेत याला 'रिव्हेंज ड्रेसिंग' (Revenge Dressing) असं म्हणतात. हे केवळ फॅशनसाठी नसतं, तर ब्रेकअपच्या खोल दुखातून बाहेर पडण्याची ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. चला जाणून घेऊया, कपड्यांचा आपल्या मनाशी नक्की काय संबंध असतो.

3/8
ब्रेकअपमुळे व्यक्तीचा स्वतःवरील विश्वास किंवा कॉन्फिडन्स सर्वात जास्त डळमळीत होतो. अशा वेळी आपल्या कपड्यांमध्ये बदल करणं हे एका 'कंट्रोल मेकॅनिझम'सारखं काम करतं. मानसशास्त्रामध्ये 'एनक्लोथ्ड कॉग्निशन' नावाची एक संकल्पना आहे. ही संकल्पना सांगते की, आपण जे कपडे घालतो, त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर आणि वागणुकीवर होतो.

4/8
जेव्हा एखादी व्यक्ती ब्रेकअपनंतर घराच्या कोपऱ्यात बसून रडण्याऐवजी जाणीवपूर्वक स्टायलिश आणि सुंदर कपडे परिधान करते, तेव्हा तिचा मेंदू 'व्हिक्टिम मोड' (बिचारी/दुखी) मधून बाहेर येऊन 'पावर मोड'मध्ये जातो. बाहेरून चांगलं दिसल्यावर तुम्हाला आतूनही शक्तिशाली, आकर्षक आणि खंबीर असल्याचं वाटू लागतं.

5/8
प्रिन्सेस डायना आणि तो ऐतिहासिक 'रिव्हेंज ड्रेस''रिव्हेंज ड्रेसिंग'चं सर्वात गाजलेलं उदाहरण म्हणजे प्रिन्सेस डायना. 1994 मध्ये जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांनी एका टीव्ही मुलाखतीत आपल्या अफेअरची कबुली दिली होती, त्याच रात्री डायना यांनी एक अत्यंत बोल्ड 'ऑफ-शोल्डर ब्लॅक ड्रेस' परिधान केला होता. एवढं मोठं वैयक्तिक दुःख समोर असतानाही, त्या ड्रेसमध्ये डायना अत्यंत खंबीर आणि सुंदर दिसत होत्या. तेव्हापासून अशा कपड्यांना 'रिव्हेंज ड्रेस' असं नाव पडलं.
प्रिन्सेस डायना आणि तो ऐतिहासिक 'रिव्हेंज ड्रेस' 'रिव्हेंज ड्रेसिंग'चं सर्वात गाजलेलं उदाहरण म्हणजे प्रिन्सेस डायना. 1994 मध्ये जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांनी एका टीव्ही मुलाखतीत आपल्या अफेअरची कबुली दिली होती, त्याच रात्री डायना यांनी एक अत्यंत बोल्ड 'ऑफ-शोल्डर ब्लॅक ड्रेस' परिधान केला होता. एवढं मोठं वैयक्तिक दुःख समोर असतानाही, त्या ड्रेसमध्ये डायना अत्यंत खंबीर आणि सुंदर दिसत होत्या. तेव्हापासून अशा कपड्यांना 'रिव्हेंज ड्रेस' असं नाव पडलं.
advertisement
6/8
'रिव्हेंज ड्रेसिंग'मुळे मन कसं सावरतं?लोकांना वाटतं की हे केवळ दुसऱ्याला जळवण्यासाठी केलं जातं, पण तसं नाहीये. स्वतःला सावरण्यासाठी ही प्रक्रिया कशी मदत करते, पाहा:
-कॉन्फिडन्स बूस्ट: चांगले कपडे घातल्यामुळे तुम्हाला जाणीव होते की, एखादं नातं संपल्यामुळे तुमचं मूल्य कमी झालेलं नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास परत येतो.
'रिव्हेंज ड्रेसिंग'मुळे मन कसं सावरतं?लोकांना वाटतं की हे केवळ दुसऱ्याला जळवण्यासाठी केलं जातं, पण तसं नाहीये. स्वतःला सावरण्यासाठी ही प्रक्रिया कशी मदत करते, पाहा:-कॉन्फिडन्स बूस्ट: चांगले कपडे घातल्यामुळे तुम्हाला जाणीव होते की, एखादं नातं संपल्यामुळे तुमचं मूल्य कमी झालेलं नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास परत येतो.
advertisement
7/8
-हार्मोनल बदल: संशोधनानुसार, जेव्हा आपण आरशात स्वतःला पाहतो आणि आपल्याला आपण आवडतो, तेव्हा शरीरात 'डोपामाइन' (Dopamine) म्हणजेच 'हॅपी हार्मोन' उत्सर्जित होतं आणि तणाव वाढवणारा 'कोर्टिसोल' हार्मोन कमी होतो.-मेंटल मेकओव्हर: नवीन हेअरकट किंवा नवीन स्टाईल म्हणजे जुन्या वेदना आणि आठवणींना मागे सोडून नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचं एक प्रतिक असतं.
-स्वतःवरचं प्रेम (Self-Love): ही केवळ दाखवेगिरी नाही, तर स्वतःवर प्रेम करण्याची एक पद्धत आहे.
-हार्मोनल बदल: संशोधनानुसार, जेव्हा आपण आरशात स्वतःला पाहतो आणि आपल्याला आपण आवडतो, तेव्हा शरीरात 'डोपामाइन' (Dopamine) म्हणजेच 'हॅपी हार्मोन' उत्सर्जित होतं आणि तणाव वाढवणारा 'कोर्टिसोल' हार्मोन कमी होतो.-मेंटल मेकओव्हर: नवीन हेअरकट किंवा नवीन स्टाईल म्हणजे जुन्या वेदना आणि आठवणींना मागे सोडून नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचं एक प्रतिक असतं.-स्वतःवरचं प्रेम (Self-Love): ही केवळ दाखवेगिरी नाही, तर स्वतःवर प्रेम करण्याची एक पद्धत आहे. "मी तुटलेली नाही, मी आजही जगाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे," हा संदेश स्वतःला आणि जगाला देण्याचा हा एक मार्ग आहे.
advertisement
8/8
म्हणूनच, जर तुमच्या आयुष्यातही असा कठीण काळ आला असेल, तर स्वतःला खोलीत कोंडून घेऊ नका. तुमचा आवडता ड्रेस काढा, स्वतःला तयार करा आणि आत्मविश्वासाने बाहेर पडा. कारण कधीकधी तुमची स्टाईलच तुमच्या मनाला सर्वात चांगलं औषध ठरू शकते.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement