Apurva Nemlekar : लग्नाच्या काही दिवसांतच अपूर्वाने दाखवले 'खरे रंग', नवरा तनुजला आता आलं टेन्शन, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अपूर्वा सासरी छान रमली आहे. पण अपूर्वाने नवऱ्याला लग्नाच्या काही दिवसांतच तिचे 'खरे रंग' दाखवले आहेत. अपूर्वानं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईनच्या दिवशी दुसरं लग्न केलं. तनुज गोवळकरबरोबर अपूर्वाने लग्नगाठ बांधली. अपूर्वाने लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अपूर्वाच्या नव्या आयुष्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम आणि शुभेच्छा दिल्यात. दरम्यान अपूर्वाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अपूर्वा सासरी छान रमली आहे. पण अपूर्वाने नवऱ्याला लग्नाच्या काही दिवसांतच तिचे 'खरे रंग' दाखवले आहेत. अपूर्वाने तनुजला थेट भांडी घासायला बसवलं आहे. लग्न होऊन काही दिवस होत नाहीत तोच अपूर्वानं नवऱ्याला भांडी घासायला लावल्याचं दिसतंय. नवऱ्याला भांडी घासायला लावून अपूर्वा मात्र रील करताना दिसत आहे.
advertisement
अपूर्वानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा नवरा तनुज भांडी घासतोय आणि अपूर्वा पिया का घर प्यारा लगे या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. अपूर्वाचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
मेरा सेन्स ऑफ ह्युमर बहोत अच्छा, आपको धीरे धीरे पता चलेगा असं म्हणत अपूर्वानं नवऱ्याला टोमणा मारला आहे. अपूर्वा आणि तनुज यांनी हा प्रमोशनल व्हिडीओ केला आहे. दोघांच्या या मजेशीर व्हिडीओला चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अपूर्वाचा मजेशीरपणा चाहत्यांना आवडला आहे.
advertisement
advertisement
अपूर्वा आणि तनुज यांनी व्हॅलेंटाईनच्या दिवशी लग्न केलं. पारंपरिक पद्धतीनं दोघांचं लग्न झालं. अपूर्वाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाआधीच्या सगळ्या विधी देखील त्यांनी अत्यंत साग्रसंगीत पार पाडल्या.
अपूर्वाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झाल्यास, 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मालिकेतील शेवंता हे पात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पण ही मालिका तिनं अर्ध्यातच सोडली होती. त्यानंतर ती 'बिग बॉस मराठी 4' मध्ये सहभागी झाली होती. अपूर्वा बिग बॉस मराठी 4 ची फर्स्ट रनरअप ठरली. त्यानंतर ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसली होती. त्यातही तिनं साकारलेली सावनी ही खलनायिका प्रेक्षकांना आवडली होती. काही दिवसांआधी ती 'शुभ विवाह' मालिका ACP च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 6:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Apurva Nemlekar : लग्नाच्या काही दिवसांतच अपूर्वाने दाखवले 'खरे रंग', नवरा तनुजला आता आलं टेन्शन, VIDEO








