Health Tips : सकाळी उठल्यावर चक्कर येते, डोळ्यांसमोर अंधारी येते ? वेळीच व्हा सावध, असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डॉक्टरांच्या मते, बहुतेक वेळा, सकाळी उठल्यावर चक्कर येणं हे शरीराच्या स्थितीत अचानक बदल झाल्यामुळे होतं. आपण झोपण्याच्या स्थितीतून म्हणजे आडवं असतो त्यानंतर सरळ उभं राहतो तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा क्षणभर कमी होतो; या स्थितीला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात.
मुंबई : झोप झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर काहींना थोडी चक्कर येण्याचा त्रास जाणवू शकतो. तुम्हालाही असं जाणवत असेल तर वेळेवर सावध व्हा.
सकाळी उठल्यावर काही सेकंदांसाठी चक्कर येणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा डोकं हलकं होणं जाणवत असेल तर ते हलक्यात घेऊ नका. बरेच जण हे सगळं थकवा, झोपेची कमतरता किंवा अशक्तपणा म्हणून नाकारतात, पण वारंवार होणारे त्रास हे शरीरातल्या एखाद्या वैद्यकीय स्थितीचं किंवा बदलाचं लक्षण असू शकतं.
advertisement
डॉक्टरांच्या मते, बहुतेक वेळा, सकाळी उठल्यावर चक्कर येणं हे शरीराच्या स्थितीत अचानक बदल झाल्यामुळे होतं. आपण झोपण्याच्या स्थितीतून म्हणजे आडवं असतो त्यानंतर सरळ उभं राहतो तेव्हा मेंदूला रक्तपुरवठा क्षणभर कमी होतो; या स्थितीला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात.
ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणजे काय?
शरीर झोपण्याच्या स्थितीतून उठण्याच्या म्हणजे उभं राहण्याच्या स्थितीत जातं तेव्हा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. शरीर लवकर जुळवून घेऊ शकत नसेल तर चक्कर येण्याची भावना निर्माण होऊ शकते. ही समस्या विशेषतः वृद्धांमधे, कमी पाणी पिणाऱ्यांमधे किंवा काही औषधे घेणाऱ्यांमधे जाणवू शकते.
advertisement
सकाळी चक्कर येण्याची सामान्य कारणं
निर्जलीकरण - रात्री शरीरातील पाणी कमी होतं. दिवसभर पुरेसं पाणी न प्यायल्यानं रक्तदाब कमी होऊ शकतो आणि सकाळी चक्कर येऊ शकते. अल्कोहोल किंवा जास्त कॅफिन घेतल्यानं ही समस्या वाढू शकते, ज्यामुळे जागं झाल्यावर चक्कर येऊ शकते.
रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होणं - सकाळी रिकाम्या पोटी जेवल्यानं काहींच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. मधुमेहींना, विशेषतः इन्सुलिन किंवा इतर औषधं घेणाऱ्यांना, हायपोग्लाइसेमियामुळे चक्कर येणं, अशक्तपणा आणि चिंता जाणवू शकते.
advertisement
औषधांचे दुष्परिणाम - रक्तदाब, नैराश्य, हृदयरोग किंवा स्लीप एपनियासाठीची औषधांमुळे देखील सकाळी चक्कर येऊ शकते. ही औषधं रक्तदाब किंवा मज्जातंतूंच्या कार्यावर परिणाम करतात.
स्लीप एपनिया - रात्री श्वासोच्छवासात अडथळा येत असेल तर शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. यामुळे सकाळी उठल्यावर चक्कर येणं किंवा जडपणा जाणवू शकतो.
कानाच्या समस्या - कानातल्या आतल्या भागामुळे शरीराचं संतुलन राखलं जातं. सूज, संसर्ग यामुळे वळताना किंवा उठताना तीव्र चक्कर येऊ शकते.
advertisement
याव्यतिरिक्त, अशक्तपणा, मायग्रेन किंवा काही न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे देखील वारंवार चक्कर येऊ शकते.
सकाळी चक्कर येणं टाळण्याचे सोपे मार्ग
सकाळी उठल्यावर चक्कर येत असेल तर अंथरुणातून पटकन उठू नका. काही मिनिटं बसा आणि नंतर हळूहळू उठा. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्या. रात्री अल्कोहोल आणि जास्त कॅफिन पिणं टाळा. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी नाश्ता नक्की करा. कोणतंही औषध घेत असाल आणि चक्कर वाढत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 8:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : सकाळी उठल्यावर चक्कर येते, डोळ्यांसमोर अंधारी येते ? वेळीच व्हा सावध, असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण










