TRENDING:

ENG vs NZ : ग्रुप 2 मध्ये मोठा ड्रामा, इंग्लंडच्या विजयाने उलथापालथ, दुसरा सेमी फायनलीस्ट कोण ठरणार?

Last Updated:
खरं तर हा सामना इंग्लंड जिंकली नसती तर इतकी उलथापालथ झाली नसती. कारण न्यूझीलंड हा सामना जिंकून 5 गुणांसह टेबल टॉप आणि सेमी फायनलला पोहोचली होती.
advertisement
1/8
ग्रुप 2 मध्ये मोठा ड्रामा, इंग्लंडच्या विजयाने उलथापालथ, दुसरा सेमी फायनलीस्ट को
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज इंग्लंडने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला आहे. न्यूझीलंडने दिलेले 159 धावांचे आव्हान इंग्लंडने 4 विकेट राखून जिंकत हा सामना जिंकला आहे.
advertisement
2/8
या विजयाने इंग्लंडला आणखीण 2 गुण मिळाले आहेत आणि ती 6 गुणांसह सूपर 2 च्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी कायम राहिली आहे.
advertisement
3/8
खरं तर हा सामना इंग्लंड जिंकली नसती तर इतकी उलथापालथ झाली नसती. कारण न्यूझीलंड हा सामना जिंकून 5 गुणांसह टेबल टॉप आणि सेमी फायनलला पोहोचली होती.
advertisement
4/8
पण आता इंग्लंड जिंकल्याने मोठा ड्रामा झाला आहे. कारण पाकिस्तानलाही सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची आणखीण एक संधी मिळाली आहे. आणि दुसरा सेमीफायनलीस्टच्या शर्यतीत आणखीण चूरस निर्माण झाली आहे.
advertisement
5/8
सुपर 8 च्या ग्रुप 2 मधे आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा सेमीफायनलीस्टसाठी शर्यत असणार आहे. या शर्यतीत न्यूझीलंड काहीच करू शकत नाही. कारण त्याने सूपर 8 मध्ये तीनही सामने संपले असून ते 3 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आणि त्यांचा रनरेट +1.390 इतका आहे.
advertisement
6/8
तर पाकिस्तानला आता न्यूझीलंडला मागे टाकून दुसरा सेमीफायनलीस्ट बनण्याची संधी आहे. पाकिस्तानचा 2 सामन्यांमध्ये एक पराभव झाला आहे, तर एक सामना रद्द झाला त्यामुळे त्यांच्याकडे 1 पॉईंट आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +1.390 आहे, तर पाकिस्तानचा नेट रनरेट मायनस 0.461 आहे.
advertisement
7/8
न्यूझीलंडच्या नेट रनरेटला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानने पहिले बॅटिंग करून 160 रन केले तर त्यांना श्रीलंकेला 96 किंवा त्यापेक्षा कमी रनवर रोखावं लागणार आहे. पाकिस्तानने 180 रन केले तर श्रीलंकेला 116 रन तसंच 200 रन केले तर 135 रनवर थांबवावं लागेल. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना 64 ते 65 रनच्या फरकाने जिंकावा लागेल.
advertisement
8/8
जर पाकिस्तान हे करण्यात यशस्वी ठरली तर ती ग्रुप 2 मध्ये दुसरी सेमी फायनलीस्ट ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ENG vs NZ : ग्रुप 2 मध्ये मोठा ड्रामा, इंग्लंडच्या विजयाने उलथापालथ, दुसरा सेमी फायनलीस्ट कोण ठरणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल