मिरर सेल्फी, प्रायव्हेट जेटने एकत्र प्रवास, विजय-संगिताच्या संसाराला 'या' अभिनेत्रीची नजर लागली? Unseen Photos आले समोर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Thalapathy Vijay Divorce: मिळालेल्या माहितीनुसार, संगीताने अर्जात नमूद केलंय की, एप्रिल २०२१ मध्ये तिला विजयच्या एका अभिनेत्रीसोबतच्या संबंधांबद्दल समजलं होतं. वारंवार विनंती करूनही विजयने हे संबंध तोडले नाहीत.
advertisement
1/10

तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि राजकीय मैदानात नवा शड्डू ठोकणारा थलापथी विजय (Thalapathy Vijay) सध्या एका मोठ्या वादळात सापडला आहे. गेली कित्येक वर्षे ज्या चर्चा केवळ गॉसिप कॉलमपुरत्या मर्यादित होत्या, त्या आता कोर्टाच्या कागदपत्रांपर्यंत पोहोचल्या आहेत.
advertisement
2/10
विजयची पत्नी संगीता सोर्णलिंगम हिने अखेर धीर सोडला असून, चेन्नईतील चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे. यामुळे केवळ सिनेसृष्टीच नाही, तर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
3/10
विजय आणि संगीता यांची जोडी ही सिनेसृष्टीतील सर्वात आदर्श जोडी मानली जात असे. पण या संसाराला आता कुणाची तरी नजर लागली आहे. घटस्फोटाच्या अर्जात संगीताने विजयवर विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळ यांसारखे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
4/10
मिळालेल्या माहितीनुसार, संगीताने अर्जात नमूद केलंय की, एप्रिल २०२१ मध्ये तिला विजयच्या एका अभिनेत्रीसोबतच्या संबंधांबद्दल समजलं होतं. वारंवार विनंती करूनही विजयने हे संबंध तोडले नाहीत, उलट त्याने संगीताला घरातच परकं केलं.
advertisement
5/10
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी अभिनेत्री तृषा कृष्णन हिचं नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. जून २०२४ मध्ये विजयच्या वाढदिवसानिमित्त तृषाने शेअर केलेल्या एका 'मिरर सेल्फी'ने इंटरनेटवर आग लावली होती.
advertisement
6/10
या फोटोसोबत तिने लिहिलेलं कॅप्शन आणि वापरलेले हार्ट, इन्फिनिटी आणि इविल आय इमोजी यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना हवा मिळाली होती.
advertisement
7/10
तसेच, डिसेंबर २०२४ मध्ये ही जोडी कीर्ती सुरेशच्या लग्नासाठी खासगी विमानाने गोव्याला गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते.
advertisement
8/10
हा वाद एका रात्रीत निर्माण झालेला नाही. संगीताने कोर्टाला सांगितलंय की, ती गेल्या दोन वर्षांपासून विजयपासून वेगळी राहत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ती लंडनमध्ये आपल्या पालकांकडे राहत असून, तिथेच तिला मानसिक आधार मिळत आहे. तब्बल २७ वर्षांच्या या प्रवासात दोन मुलं जॅसन आणि दिव्या असूनही, हा संसार आता पूर्णपणे मोडकळीस आला आहे.
advertisement
9/10
या प्रकरणाची पहिली सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. न्यायालयाने विजयला रीतसर नोटीस बजावली असून त्याला स्वतः कोर्टात हजर राहावं लागणार आहे.
advertisement
10/10
विजयने नुकताच आपला राजकीय पक्ष 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) स्थापन केला असून २०२६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी तो सज्ज झाला आहे. अशा वेळी स्वतःच्या पत्नीने केलेले हे गंभीर आरोप विजयच्या राजकीय भवितव्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मिरर सेल्फी, प्रायव्हेट जेटने एकत्र प्रवास, विजय-संगिताच्या संसाराला 'या' अभिनेत्रीची नजर लागली? Unseen Photos आले समोर