
गुरुवारी वरळी डोममध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.त्यावेळी राष्ट्रवादीच्या पत्रकारमभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वर्तनावरुन आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुनेत्रा काकींना आम्ही कंट्रोल करु अशा भ्रमात राहू नका असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.