मराठी पुस्तकं घेतलीच पाहिजे! मुंबईत भरलं खास पुस्तक प्रदर्शन, सवलतही मिळणार!
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडत आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला असून विविध वर्तमानपत्रांतील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
advertisement
1/5

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत पुस्तकप्रेमींसाठी एक विशेष पर्वणी सजली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पुढाकारातून मुंबईतील शिवाजी पार्क येथे अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
2/5
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडत आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला असून विविध वर्तमानपत्रांतील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे प्रदर्शन 1 मार्चपर्यंत चालणार आहे.
advertisement
3/5
या प्रदर्शनात 92 नामांकित प्रकाशक सहभागी झाले असून हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. कादंबरी विभागात ययाति, मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी, कोसला, पानिपत आणि बटाट्याची चाळ यांसारख्या गाजलेल्या साहित्यकृती उपलब्ध आहेत.
advertisement
4/5
ऐतिहासिक साहित्य विभागात छावा, राजा शिवछत्रपती, पानिपत, संभाजी आणि महाराष्ट्राचा इतिहास यांसारखी पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत.
advertisement
5/5
राजकीय साहित्यामध्ये पंचवार्षिक, लोकशाहीचा प्रवास आणि सत्ता आणि संघर्ष ही पुस्तके उपलब्ध आहेत. आरोग्यविषयक विभागात आरोग्यसंपदा, निरोगी आयुष्यआणि आहार आणि आरोग्य यांसारखी उपयुक्त पुस्तके ठेवण्यात आली आहेत. संतसाहित्य, पौराणिक कथा आणि बालसाहित्याचाही मोठा संग्रह येथे पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रदर्शनातील पुस्तके अवघ्या 50 रुपयांपासून सुरू होत असून 500 ते 1000 रुपयांपर्यंत विविध किंमतींमध्ये उपलब्ध आहेत. काही स्टॉल्सवर 12 ते 20 टक्के विशेष सवलत देण्यात येत आहे, त्यामुळे वाचकांना दर्जेदार पुस्तके परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मराठी पुस्तकं घेतलीच पाहिजे! मुंबईत भरलं खास पुस्तक प्रदर्शन, सवलतही मिळणार!