पुणे : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत, त्यामुळे पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. कुठे कोयता घेऊन रस्त्यावर दहशत तर कुठे गोळीबाराच्या घटना घडत आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादाायक व्हिडीओ समोर आला आहे. एका कॅफेमध्ये बसलेल्याा अल्पवयीन मुलाला एका टोळक्याने कॅफेमध्ये घुसून बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक २६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. मारहाण झालेला अल्पवयीन मुलगा आपल्या एका मित्र आणि मैत्रिणीसोबत कॅफेमध्ये बसलेला होता. संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ३ तरुण हे कॅफेमध्ये आले. त्यांनी अल्पवयीन मुलाला पकडलं आणि मारहाण सुरू केली.
[video width="848" height="480" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/PUNE-MARHAN-CCTV-2026-02-15ed0e2292eceaa1c95a83739e9a06b7.mp4"][/video]
हा प्रकार इथंच थांबला नाही, या तिघांनी अल्पवयीन मुलाला पकडलं आणि फरफटत खाली घेऊन गेले. पायऱ्यांवरून अक्षरश: ओढत नेलं होतं. यावेळी या अल्पवयीन मुलासोबत त्याचा मित्र आणि मैत्रीण वाचवण्यासाठी पुढे धावले पण या टोळक्याने त्यांच्यासोबत दमदाटी केली.
हा सगळा प्रकार कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून ही मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे सिंहगड परिसरात खळबळ उडाली आहे.
