TRENDING:

T20 World Cup : भारतापेक्षा पाकिस्तानचं सेमी फायनलचं इक्वेशन सोपं, श्रीलंकेला किती रननी हरवावं लागणार?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या रेसमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. सुपर-8 च्या ग्रुप 2 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
advertisement
1/8
भारतापेक्षा पाकिस्तानचं सेमी फायनल गणित सोपं, श्रीलंकेला किती रननी हरवावं लागेल?
न्यूझीलंडने दिलेल्या 160 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 19.3 ओव्हरमध्ये यशस्वीपणे पार केला. इंग्लंडने याआधीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे, पण या ग्रुपमधल्या दुसऱ्या टीमसाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात अजूनही रेस सुरू आहे.
advertisement
2/8
या सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला असता तर पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं असतं, पण आता पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवून सेमी फायनलला पोहोचण्याची संधी आहे.
advertisement
3/8
इंग्लंडने 3 सामन्यात 3 विजय मिळवून 6 पॉईंट्ससह सेमी फायनलमध्ये आधीच प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंडचे 3 सामन्यात एका विजय आणि एका पराभवासह 3 पॉईंट्स आहेत. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे दोन्ही टीमना 1-1 पॉईंट देण्यात आला.
advertisement
4/8
पाकिस्तानचा 2 सामन्यांमध्ये एक पराभव झाला आहे, तर एक सामना रद्द झाला त्यामुळे त्यांच्याकडे 1 पॉईंट आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +1.390 आहे, तर पाकिस्तानचा नेट रनरेट मायनस 0.461 आहे.
advertisement
5/8
शनिवारी पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे, या सामन्यात पाकिस्तानला फक्त विजयच मिळवायचा नाही, तर न्यूझीलंडच्या नेट रनरेटला मागे टाकण्यासाठी श्रीलंकेला खूप मोठ्या फरकाने हरवावं लागणार आहे.
advertisement
6/8
न्यूझीलंडच्या नेट रनरेटला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानने पहिले बॅटिंग करून 160 रन केले तर त्यांना श्रीलंकेला 96 किंवा त्यापेक्षा कमी रनवर रोखावं लागणार आहे. पाकिस्तानने 180 रन केले तर श्रीलंकेला 116 रन तसंच 200 रन केले तर 135 रनवर थांबवावं लागेल. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना 64 ते 65 रनच्या फरकाने जिंकावा लागेल.
advertisement
7/8
या सामन्यात पाकिस्तानला आव्हानाचा पाठलाग करावा लागला तर त्यांना लवकर सामना संपवावा लागेल. श्रीलंकेने 140 रनचं आव्हान दिलं तर 13 ओव्हरमध्ये, 160 रनचं आव्हान 13.2 ओव्हरमध्ये पार करावं लागणार आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला 64 रननी विजय मिळवावा लागेल किंवा 13 ओव्हरमध्ये श्रीलंकेचं आव्हान पार करावं लागेल.
advertisement
8/8
श्रीलंकेची टीम ही सध्या संघर्ष करत आहे, त्यामुळे पाकिस्तानला त्यांना 65 रनच्या फरकाने हरवण्याची शक्यता आहे, पण दुसरीकडे भारताला मात्र सेमी फायनलला पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य टीमला हरवावं लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : भारतापेक्षा पाकिस्तानचं सेमी फायनलचं इक्वेशन सोपं, श्रीलंकेला किती रननी हरवावं लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल