TRENDING:

Puran Poli : पुरण वाटायला पाटा-वरवंटा नाहीये? मिक्सरमध्ये पुरण वाटताना 'ही' चूक टाळा, म्हणजे पोळी फुटणार नाही

Last Updated:
मिक्सरमध्ये वाटलेलं पुरण चिकट होतं किंवा त्यात डाळीचे कण राहतात, ज्यामुळे पोळी लाटताना ती फाटते. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल, तर तुम्ही पुरण वाटताना एक मोठी चूक करताय. ती चूक कोणती आणि मिक्सरमध्ये 'परफेक्ट' पुरण कसं वाटायचं? चला जाणून घेऊया.
advertisement
1/7
मिक्सरमध्ये पुरण वाटताना 'ही' चूक टाळा, म्हणजे पोळी फुटणार नाही
पूर्वीच्या काळी घराघरात पुरण वाटण्यासाठी पाटा-वरवंटा किंवा पुरण यंत्राचा वापर व्हायचा. त्यामध्ये वाटलेलं पुरण इतकं मऊ व्हायचं की पोळी लाटताना ती कधीच फुटायची नाही. पण आताच्या धावपळीच्या युगात आणि छोट्या किचनमध्ये पाटा-वरवंटा शोधूनही सापडत नाही. अशा वेळी महिला वळतात त्या घरातील मिक्सरकडे.
advertisement
2/7
मिक्सरमध्ये पुरण वाटणं सोपं असलं तरी, अनेक महिलांची एक तक्रार असते की "मिक्सरमध्ये वाटलेलं पुरण चिकट होतं किंवा त्यात डाळीचे कण राहतात, ज्यामुळे पोळी लाटताना ती फाटते." जर तुमच्यासोबतही असं घडत असेल, तर तुम्ही पुरण वाटताना एक मोठी चूक करताय. ती चूक कोणती आणि मिक्सरमध्ये 'परफेक्ट' पुरण कसं वाटायचं? चला जाणून घेऊया.
advertisement
3/7
मिक्सरमध्ये पुरण वाटताना होणारी सर्वात मोठी 'चूक'अनेक महिला डाळ आणि गूळ शिजल्यानंतर ते मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देतात आणि मग मिक्सरला लावतात. हीच ती सर्वात मोठी चूक आहे.का टाळावे? पुरण एकदा थंड झालं की डाळ कडक होते. थंड झालेली डाळ मिक्सरमध्ये फिरवली की तिचे बारीक कण राहतात. हेच कण पोळी लाटताना अडथळा ठरतात आणि पोळी फुटते. तसेच थंड पुरण वाटताना मिक्सरवर जास्त ताण येतो आणि पुरण हवं तसं मऊ (Smooth) होत नाही.
advertisement
4/7
'या' पद्धतीने वाटा पुरण; पोळी होईल कापसासारखी मऊजर तुम्हाला पाटा-वरवंट्यासारखं मऊ पुरण हवं असेल, तर या स्टेप्स फॉलो करा:1. गरम असतानाच वाटा: डाळ आणि गूळ शिजवून त्यातील पाणी पूर्णपणे आटलं की, वाफ निघत असतानाच ते मिश्रण मिक्सरमध्ये टाका. गरम पुरण अतिशय मऊ होतं आणि त्यात एकही गाठ राहत नाही.
advertisement
5/7
2. डाळीचे प्रमाण कमी ठेवामिक्सरच्या भांड्यात एकाच वेळी खूप जास्त पुरण भरू नका. अर्ध्यापेक्षा कमी भांडं भरा, जेणेकरून ते व्यवस्थित फिरलं जाईल आणि डाळ बारीक होईल.3. पाण्याचा वापर टाळापुरण वाटताना चुकूनही त्यात पाणी किंवा दूध टाकू नका. यामुळे पुरण पातळ होईल आणि तुम्हाला पोळी लाटता येणार नाही. जर पुरण खूपच कोरडं वाटत असेल, तर चमच्याने एकदा हलवून पुन्हा फिरवा.
advertisement
6/7
4. 'पल्स' मोडचा वापर करा:मिक्सर सतत 1-2 मिनिटं फिरवण्यापेक्षा 'पल्स' मोडवर (बटण उलटं फिरवून) 3-4 वेळा फिरवा. यामुळे डाळ एकसारखी वाटली जाते.जर मिक्सरमध्ये वाटूनही तुम्हाला शंका वाटत असेल, तर वाटलेलं पुरण एकदा हाताने स्मॅश करून पहा. जर एखादा डाळीचा कण लागला, तर ते पुरण गरम कढईत पुन्हा 2 मिनिटं परता. यामुळे गूळ व्यवस्थित विरघळतो आणि पुरणाला छान चकाकी येते.
advertisement
7/7
तंत्रज्ञानाचा वापर करताना काही छोट्या ट्रिक्स वापरल्या, तर हाताला त्रास न होता पारंपारिक चवीची पुरणपोळी बनवता येते. यंदा होळीला मिक्सरमध्ये पुरण वाटताना 'गरम असताना वाटण्याची' ही ट्रिक नक्की वापरा आणि तुमची पोळी किती मऊ झाली ते आम्हाला सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Puran Poli : पुरण वाटायला पाटा-वरवंटा नाहीये? मिक्सरमध्ये पुरण वाटताना 'ही' चूक टाळा, म्हणजे पोळी फुटणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल