TRENDING:

रिअल लग्न राहिलं बाजूला, रील लग्नाची वरात घेऊन लालबागमध्ये पोहोचला मराठी अभिनेता, VIDEO

Last Updated:

हा मराठी अभिनेता रिअल आयुष्यातील लग्न तो कधी करेल हे माहिती नाही पण त्याच्या रील लग्नाची वरात घेऊन तो थेट त्याच्या होम ग्राऊंडवर पोहोचला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मराठी इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे सिंगल आहे. ते लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असाच एक प्रसिद्ध अभिनेता, जो दिसायला प्रचंड हँडसम आहे. अनेक वर्ष मराठी मालिका विश्वात काम करतोय. त्याने अनेक तरुणींची मनं जिंकली आहेत. मात्र वयाच्या 34 व्या वर्षीही हा अभिनेता सिंगल आहे.
News18
News18
advertisement

या अभिनेत्याचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं आहे. मात्र त्याने कोणत्याच चर्चांना दुजोरा दिला नाही. रिअल आयुष्यातील लग्न तो कधी करेल हे माहिती नाही पण त्याच्या रील लग्नाची वरात घेऊन तो थेट त्याच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच त्याच्या एरियात पोहोचला आहे.

( Marathi Serial TRP : सायलीचा नाद नाय करायचा! तेजश्री प्रधानवर भारी पडली 'कमळी', TRP मध्ये कोणी मारली बाजी? )

advertisement

आपण बोलतोय तो अभिनेता म्हणजे विवेक सांगळे. विवेक सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करतोय. मालिकेत त्यानं जिवा देशमुख ही भूमिका साकारली आहे. मालिकेत सध्या लगीन सराई सुरू आहे. जिवा - नंदिनी आणि पार्थ-काव्या यांचं घरच्यांनी पुन्ही लग्न लावून द्यायचं ठरवलं आहे. लग्नानंतरच प्रेम आणि प्रेमानंतरच लग्न मालिकेत पाहायला मिळत आहे.

advertisement

काव्यार्थ आणि जिवांदिनी यांचं लग्न मोठ्या दणक्यात लावण्यात आलं आहे. लग्न दणक्यात झालं म्हणजे लग्नाची वरात देखील मोठ्या दिमाखात काढण्यात आली. परळच्या लालबागमध्ये काव्यार्थ आणि जिवांदिनी यांच्या लग्नाची वरात शूट करण्यात आली. लालबागमध्ये या चौघांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

काव्यार्थ आणि जिवांदिनी यांच्याबरोबर त्यांचे आई - बाबा म्हणजेच अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऋजुता देशमुख देखील होते. सगळ्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन देखील घेतलं. वरातीत सगळ्यांनी ठेका धरला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 वर्षांच्या चवीची परंपरा,150 पदार्थांचे डेस्टिनेशन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये
सर्व पहा

लालबाग म्हणजेच अभिनेता विवेक सांगळेचं होमपिच आहे. विवेकचा जन्म, बालपण, शिक्षण हे लालबागमध्ये गेलं. तो लालबागच्या काळाचौकी परिसरात राहिला. लालबागशी त्याचं जवळचं कनेक्शन आहे. विवेकचे वडिल गिरणी कामगार होते. त्याने वडिलांना त्यांच्या गिरिणीच्या समोरच लालबागमध्ये घर घेऊन दिलं. विवेक आजही लालबागमध्ये राहतो.

मराठी बातम्या/मनोरंजन/
रिअल लग्न राहिलं बाजूला, रील लग्नाची वरात घेऊन लालबागमध्ये पोहोचला मराठी अभिनेता, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल