Mumbai Shopping: स्वस्तात मस्त खरेदीसाठी मुंबईतील 9 फेमस स्ट्रीट मार्केट, कुठं काय मिळतं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Shopping: मायानगरी मुंबई दुरून खूप महागडी आणि हायफाय वाटते. पण इथलं स्ट्रीट मार्केट परवडणाऱ्या आणि स्वस्तातल्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईतील याच प्रसिद्ध मार्केटबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/9

मुंबईतील कुलाबा कॉझवे हे मार्केट स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे हातमागावर तयार होणाऱ्या गोष्टी, कपडे, पितळी वस्तू, अगरबत्ती, कपडे, शूज, ज्वेलरी आणि पुस्तके अगदी परवडणाऱ्या दरात मिळतात. हे मार्केट सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असते.
advertisement
2/9
फॅशन स्ट्रीट हे मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्टेशनजवळचं प्रसिद्ध मार्केट आहे. या ठिकाणी ट्रेंडी आणि लेटेस्ट फॅशनचे साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांचं शॉपिंगसाठी हे आवडतं ठिकाण आहे.
advertisement
3/9
वांद्रे परिसरातील लिंकिंग रोड हे देखील मुली आणि महिलांच्या आवडीचं ठिकाण आहे. इथं अगदी स्वस्तात शॉपिंग करता येते. त्यामुळे वेस्टर्न फूट वेअर, कपडे आणि अॅक्सेसरिजच्या खरेदीसाठी आवर्जून इथं येतात.
advertisement
4/9
मुंबईतला चोर बाजार हे नेहमी गजबजलेलं ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक हटके गोष्टी अगदी स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे ग्राहकांची या मार्केटला नेहमीच पसंती असते.
advertisement
5/9
वांद्रे रेल्वे स्टेशनच्या जवळ असणारा हिल रोड हा देखील शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथं कपडे, शूज, ज्वेलरी, बॅग आदी साहित्य अगदी स्वस्तात आणि अनेक व्हरायटींमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
6/9
मुंबईत शॉपिंग म्हटलं की अनेकांना क्रॉफर्ड मार्केट आठवतं. होलसेल दरातल्या शॉपिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. फळे, भाज्या, मसाले इथं अगदी होलसेल दरात मिळतात. तसेच तुम्हाला जर पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची आवड असेल, तर खरेदीसाठी हे मार्केट बेस्ट पर्याय आहे.
advertisement
7/9
अंधेरी जवळ असणारं लोखंडवाला मार्केट खास चप्पल आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथं कपड्यांच्या अनेक व्हरायटी आणि उत्तम कलेक्शन उपलब्ध आहे. त्यामुळे कपड्यांची खरेदी असेल तर अनेकजण या ठिकाणी पसंती देतात.
advertisement
8/9
कपड्यांच्या खरेदीसाठी दादरमधील हिंदमाता मार्केट हे देखील प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये कपड्यांची अनेक दुकाने आहेत. ड्रेस, साड्या तसेच इतर कपड्यांचं देखील मोठं कलेक्शन या ठिकाणी आहे.
advertisement
9/9
मुंबईत दागिन्यांची खरेदी करायची असेल तर झवेरी बाजार हा उत्तम पर्याय आहे. इथल्या ‘ज्वेलरी मार्केट’वरूनच या भागाला झवेरी बाजार हे नाव पडलं. या ठिकाणी विविद प्रकार आणि डिझाईनचे आकर्षक दागिने मिळतात. दागिन्यांची खरेदी असेल तर अनेकजण याच ठिकाणाला पसंती देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mumbai Shopping: स्वस्तात मस्त खरेदीसाठी मुंबईतील 9 फेमस स्ट्रीट मार्केट, कुठं काय मिळतं?