टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकु सिंह यांच्या वडील खानचंद सिंह यांचे आज नोएडातील यथार्थ हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. खानचंद सिंह हे 58 वर्षांचे होते आणि त्यांना फोर्थ स्टेजचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर ग्रेटर नोएडाच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सूरू होते.
खानचंद सिंह यांची नुकतीच तब्येत खराब झाली होती. ज्यामुळे 21 फेब्रुवारी 2026 पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सूरू होता.या उपचारा दरम्यान त्यांना व्हेंटीलेटरच्या सपोर्टवर ठेवण्यात आले होते. पण शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता,अशी माहिती डॉ. सुनील कुमार यांनी सांगितले.
दरम्यान खानचंद सिंह यांच ज्यावेळेस निधन झालं तेव्हा रिंकु सिंह टीम इंडियासोबत होता.टीम इंडियाने आदल्याच दिवशी झिम्बाबेचा पराभव केला होता.या सामन्यात रिंकु सिंहला संधी मिळाली नव्हती.पण मैदानात फिल्डींग करताना तो दिसला होता.त्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी कळताच तो घरी निघाला होता.
रिंकु सिंहच्या वडिलांवर अंतिम संस्कार अलीगडमध्ये करण्यात आले होते. रिंकु सिंहने यावेळी वडिलांना खांदा दिला होता. हा खांदा देताना रिंकु डोळ्यात अश्रू आले होते. तो या घटनेने पुर्णपणे तुटला होता. पण स्वत:ला सावरत वडिलांना शेवटचा निरोप देत होता.त्यामुळे रिंकु सिंह आपल्या वडिलांना शेवटचा निरोप देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
रिंकुच्या वडिलांच्या निधनानंतर आता त्याची होणारी बायको खासदार प्रिया सरोजने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोल्टमध्ये ती लिहते की, "आदरणीय बाबूजींचे आज सकाळी निधन झाले. हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप भावनिक आणि वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने आमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे जी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. त्यांनी आयुष्यभर साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते कुटुंबाचे आधारस्तंभ होते. आम्हाला नेहमीच त्यांचे प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाकडून एक भक्कम आधार हिरावून घेतला आहे. मी देवाकडे त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करतो. त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्यासोबत राहतील."
दरम्यान मागच्याच वर्षी जूनमध्ये रिंकु सिंहचा खासदार प्रिया सरोज सोबत साखरपूडा पार पडला होता. या साखरपूड्यानंतर जून 2026 मध्ये हे दोघेही लग्न करणार होते. पण त्याआधीच रिंकूच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता ते रिंकूचे लग्न पाहू शकणार नाही आहेत.
