T20 World Cup : सेमी फायनलचं तिकीट ठरवणार इडन गार्डन, पण... भारत-वेस्ट इंडिजचं धडकी भरवणारं रेकॉर्ड!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपचा थरार आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सेमी फायनलच्या 2 टीम निश्चित झाल्या असून आणखी 2 टीमसाठी चार टीममध्ये रेस सुरू आहे.
advertisement
1/7

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आधीच सेमी फायनलमध्ये पोहोचल्या आहेत. तर आणखी दोन जागांसाठी टीम इंडिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा सुरू आहे. यात भारत-वेस्ट इंडिजपैकी एक टीम आणि न्यूझीलंड-पाकिस्तानपैकी एक टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
2/7
रविवारी कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात ज्या टीमचा विजय होईल ती टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. तसंच पराभूत टीमचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात येईल.
advertisement
3/7
वेस्ट इंडिजच्या टीमने 2016 साली कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात इतिहास घडवला होता. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कार्लोस ब्रॅथवेटने बेन स्टोक्सला मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉल 4 सिक्स मारून वेस्ट इंडिजला थरारक विजय मिळवून दिला.
advertisement
4/7
वेस्ट इंडिजच्या टीमने या मैदानात ऐतिहासिक विजय मिळवला असला तरी त्यांचं भारताविरुद्धचं रेकॉर्ड निराशाजनक आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात इडन गार्डनमध्ये 4 मॅच झाल्या आहेत, या चारही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे.
advertisement
5/7
वनडे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजने एकदाही या मैदानात भारताचा पराभव केलेला नाही. 1988, 1993 आणि 1994 साली वेस्ट इंडिजला इथे भारताविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. तर टेस्टमध्ये दोन्ही टीमचं रेकॉर्ड बरोबरीत आहे. वेस्ट इंडिजने 1958, 1966 आणि 1983 साली तर भारताने 1974, 2011 आणि 2013 साली विजय मिळवला.
advertisement
6/7
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात मात्र वेस्ट इंडिजचं भारताविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 4 मॅच झाल्या आहेत, यातल्या 3 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा आणि एका सामन्यात भारताचा विजय झाला.
advertisement
7/7
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात मात्र टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर दबदबा राहिला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा 19 सामन्यांमध्ये विजय झाला तर वेस्ट इंडिजला 10 मॅच जिंकता आल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सेमी फायनलचं तिकीट ठरवणार इडन गार्डन, पण... भारत-वेस्ट इंडिजचं धडकी भरवणारं रेकॉर्ड!