TRENDING:

महिलेची छेडछाड करणाऱ्या 2 नायजेरियन तरुणांना जमावाने चोपलं, छ.संभाजीनगरमधील घटना

Last Updated:

महिलेसोबत गैरवर्तन झाल्याची माहिती पसरताच स्थानिकांनी संबंधित तरुणांना पकडून बेदम मारहाण केली. हातात दगडं आणि मिळेल त्या वस्तूने

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एमजीएम हॉस्पिटलच्या परिसरात दोन नागजेरियन तरुणांना जमावावे बेदम मारहाण केली.  एका महिलेला छेडछाड करून मारहाण केल्याचा आरोप करत संतप्त जमावाने या नायजेरियन तरुणांना चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्याा माहितीनुसाार, छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम हॉस्पिटल परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  दोन परदेशी नायजेरियन तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेची छेडछाड करून मारहाण केल्याचा आरोप एका महिलेनं केला. त्यानंतर जमलेल्या जमावाने या तरुणांना पकडलं.  या घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले.

advertisement

महिलेसोबत गैरवर्तन झाल्याची माहिती पसरताच स्थानिकांनी संबंधित तरुणांना पकडून बेदम मारहाण केली. हातात दगडं आणि मिळेल त्या वस्तूने त्यांना मारहाण करण्यात आली. जमावाने या दोन्ही तरुणांना चांगलाच चोप दिला. या दोन्ही तरुणांनीही जमावावर हल्ला केला होता. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी घेतलं दोन्ही तरुणांना ताब्यात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 वर्षांच्या चवीची परंपरा,150 पदार्थांचे डेस्टिनेशन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये
सर्व पहा

दरम्यान, स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमाव ऐकण्याच्या तयारीत नव्हता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी दोन्ही तरुणांची सुटका केली. सध्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिलेची छेडछाड करणाऱ्या 2 नायजेरियन तरुणांना जमावाने चोपलं, छ.संभाजीनगरमधील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल