TRENDING:

Puran Poli Hacks : 2 दिवसात होळी! पुरणपोळीची तयारी आताच करून ठेवा; Working Womens साठी वेळ वाचवणाऱ्या स्मार्ट ट्रिक्स

Last Updated:
महिलांनो ऑफिसच्या धावपळीत पुरणपोळीचा बेत जमणार का? 'या' स्मार्ट ट्रिक्स वाचवतील तुमचा वेळ
advertisement
1/8
पुरणपोळीची तयारी आताच करून ठेवा; ह्या घ्या वेळ वाचवणाऱ्या स्मार्ट ट्रिक्स
अवघ्या दोन दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. घराघरात आता पुरणपोळीचा खमंग सुवास दरवळू लागेल. पण, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी (Working Women) सण म्हणजे आनंदासोबतच कामाची मोठी कसरत असते. दिवसभर ऑफिसची धावपळ आणि संध्याकाळी घरी येऊन सण साजरा करणे, यात अनेकदा पुरणपोळीचा बेत बेतच राहून जातो किंवा खूप धावपळ होते.
advertisement
2/8
जर तुम्हालाही ऑफिस सांभाळून पारंपारिक पद्धतीने पुरणपोळी करायची असेल, तर टेन्शन घेऊ नका. होळीच्या दिवशी कामाचा डोंगर उपसण्यापेक्षा, आताच 'या' 5 स्मार्ट ट्रिक्स फॉलो करा. यामुळे होळीच्या दिवशी तुमचं काम 70% कमी होईल आणि तुम्ही सणाचा आनंदही घेऊ शकाल.
advertisement
3/8
पुरणपोळीतलं सर्वात जास्त वेळ खाणारं काम म्हणजे 'पुरण' शिजवणं आणि वाटणं. होळीच्या दोन दिवस आधीच डाळ शिजवून, गुळ घालून पुरण तयार करून ठेवा. हे पुरण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. होळीच्या दिवशी फक्त फ्रीजमधून बाहेर काढा आणि पोळ्या लाटायला सुरुवात करा. पुरण जितकं जुनं होतं, तितकी त्याची चव अधिक खुलते. त्यामुळे शिळं पुरण कसं वापरु हा विचार डोक्यातून काढून टाका.
advertisement
4/8
डाळीचे पाणी (येळवणी) फ्रीजमध्ये साठवापुरणपोळीसोबत लागणारी 'कटाची आमटी' करण्यासाठी डाळीचं पाणी (कट) लागतं. डाळ शिजवल्यावर ते पाणी फेकून न देता एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. होळीच्या दिवशी फक्त फोडणी दिली की तुमची झणझणीत आमटी 10 मिनिटांत तयार होईल.
advertisement
5/8
कणिक मळण्याची 'खास' पद्धतपुरणपोळीसाठी कणिक खूप मऊ आणि लवचिक असावी लागते. होळीच्या दिवशी सकाळीच किंवा आदल्या रात्री कणिक मळून, त्याला भरपूर तेल लावून प्लास्टिक पिशवीत किंवा डब्यात झाकून ठेवा. यामुळे कणिक छान मुरते आणि पोळी लाटताना ती फुटत नाही. ऐनवेळी कणिक मळण्याची घाई वाचेल.
advertisement
6/8
आमटीसाठी लागणारे ओले खोबरे, आले-लसूण पेस्ट आणि मसाला यांचे वाटण देखील आधीच करून ठेवा. सुके खोबरे भाजून त्याची पावडर करून ठेवल्यास आयत्या वेळी फक्त मसाला तेलात परतायचा आणि आमटी तयार! यामुळे स्वयंपाकघरातील पसाराही कमी होईल.
advertisement
7/8
जर तुमच्याकडे पुरण यंत्र नसेल, तर गरम डाळ चाळणीतून काढण्याऐवजी फूड प्रोसेसर किंवा मिक्सरचा वापर करा. डाळ पूर्णपणे कोरडी करून मिक्सरमध्ये फिरवल्यास काही सेकंदांत मऊ पुरण तयार होते. फक्त लक्षात ठेवा, डाळ गरम असतानाच मिक्सरमधून काढा जेणेकरून गाठी राहणार नाहीत.
advertisement
8/8
रात्रीची पूर्वतयारी: होळीच्या आदल्या रात्री किचनची साफसफाई आणि आवश्यक भांडी बाहेर काढून ठेवा.मेन्यू फिक्स करा: पुरणपोळीसोबत भजी, भात किंवा काय काय करायचे आहे, याची यादी तयार ठेवा जेणेकरून ऐनवेळी गोंधळ होणार नाही.सण हा आनंदासाठी असतो, स्वतःला थकवण्यासाठी नाही. या छोट्या पण प्रभावी ट्रिक्स वापरून तुम्ही ऑफिसची जबाबदारी सांभाळून घरच्यांना मऊ लुसलुशीत पुरणपोळीचा बेत देऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Puran Poli Hacks : 2 दिवसात होळी! पुरणपोळीची तयारी आताच करून ठेवा; Working Womens साठी वेळ वाचवणाऱ्या स्मार्ट ट्रिक्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल