TRENDING:

EVM नव्हे, जनतेचा निर्णय! फक्त चारच राज्यांत काँग्रेसची ताकद 50 पार; मोदींचा सवाल, कोणती ती राज्ये?

Last Updated:

News18 Rising Bharat Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या ईव्हीएम आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांच्या घटत्या जनाधारावर प्रकाश टाकला आणि 1984 नंतर मतांचा टक्का सातत्याने घसरल्याचे सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या ईव्हीएम (EVM) हॅकिंग आणि ‘मतांची चोरी’ या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, काँग्रेसची मते चोरी होत नाहीत, तर खरी गोष्ट अशी आहे की देशातील जनता आता त्यांना मत देण्यालायकच मानत नाही. पंतप्रधानांनी काँग्रेसच्या या अधोगतीला ऐतिहासिक म्हटले असून 1984 नंतर त्यांच्या सतत घसरत गेलेल्या जनाधाराचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, आज परिस्थिती अशी आहे की केवळ चार राज्यांत काँग्रेसचे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत. ते 'न्यूज18 रायझिंग भारत समिट 2026' च्या मंचावरुन बोलत होते.
News18
News18
advertisement

पीएम मोदी यांच्या मते, देशभरात काँग्रेसचा जनाधार मोठ्या प्रमाणात आक्रसला आहे. सध्या फक्त चार राज्यांमध्येच विधानसभा स्तरावर काँग्रेसकडे 50 किंवा त्यापेक्षा अधिक आमदार (MLAs) आहेत. सध्याच्या राजकीय आकडेवारीनुसार ही चार राज्ये पुढीलप्रमाणे आहेत.

कर्नाटक: 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत 135 जागा जिंकल्या आणि स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन केले.

advertisement

राजस्थान: 2023 च्या निवडणुकांत काँग्रेस सत्तेबाहेर गेली असली तरी विरोधी पक्ष म्हणून तिच्याकडे अजूनही 69 आमदार आहेत.

मध्य प्रदेश: 2023 च्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला, तरीही राज्यात काँग्रेसचे 66 आमदार आहेत.

तेलंगणा: 2023 च्या अखेरीस झालेल्या निवडणुकांत काँग्रेसने बीआरएस (BRS) ला पराभूत करत 64 जागा जिंकल्या आणि सरकार स्थापन केले.

advertisement

दरम्यान हिमाचल प्रदेश आणि झारखंडसारख्या राज्यांत काँग्रेस सत्तेत किंवा सत्तेची भागीदार आहे.मात्र त्या ठिकाणी त्यांच्या आमदारांची संख्या 50 पेक्षा कमी आहे.

1984 नंतर काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीतील ऐतिहासिक घसरण

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या घटत्या जनाधारावर भाष्य केले. 1984 च्या लोकसभा निवडणुकीकडे पाहिले तर इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे काँग्रेसला 414 जागा आणि सुमारे 48.1% मते मिळाली होती. मात्र 1989 च्या निवडणुकीत त्यांचा मतांचा टक्का घसरून 39.5% वर आला.

advertisement

1984 नंतर काँग्रेसचा मतांचा वाटा कसा कमी होत गेला, ते पुढीलप्रमाणे...

1989 ते 1999 (घसरणीचा काळ)

बोफोर्स घोटाळा आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर 1989 मध्ये काँग्रेसचा मतांचा वाटा 39.5% (197 जागा) इतका राहिला.

1991 मध्ये तो 36.2% झाला.

1996 मध्ये तो आणखी घसरून 28.8% झाला.

1998 पर्यंत तो केवळ 25.8% वर आला.

advertisement

यूपीएचा काळ (2004-2009)

2004 मध्ये काँग्रेसला 26.5% मते मिळाली आणि 2009 मध्ये हा आकडा 28.5% झाला. यूपीए (UPA) आघाडीच्या जोरावर काँग्रेसने 10 वर्षे केंद्रात सत्ता चालवली. मात्र या काळातही पक्षाला स्वतःच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर 30% मतांचा टप्पा पार करता आला नाही.

2014 ते 2024 (ऐतिहासिक घसरण)

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेसमोर काँग्रेसचा मतांचा वाटा इतिहासातील सर्वात नीचांकी पातळीवर म्हणजे 19.3% (फक्त 44 जागा) इतका घसरला.

2019 मध्ये तो 19.5% (52 जागा) राहिला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबाच्या दरात उलथापालथ, आल्याला 9000 रुपये मिळाला भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया (INDIA) आघाडीसोबत लढताना काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होऊन 99 जागा मिळाल्या, तरीही राष्ट्रीय मतांचा टक्का सुमारे 21.2% पर्यंतच मर्यादित राहिला. यावरून 1984 नंतर काँग्रेसचा मतांचा टक्का सातत्याने घसरत गेल्याचे स्पष्ट दिसून येते.

मराठी बातम्या/देश/
EVM नव्हे, जनतेचा निर्णय! फक्त चारच राज्यांत काँग्रेसची ताकद 50 पार; मोदींचा सवाल, कोणती ती राज्ये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल