Thalapathy Vijay Net Worth: भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता! 27 वर्षांचा संसार मोडला, थलापति विजयच्या संपत्तीसमोर बॉलिवूड स्टार्सही फिके
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Thalapathy Vijay Net Worth : अभिनेता थलापति विजयचा 27 वर्षांचा संसार मोडला आहे. अभिनेता सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची ऐकूण संपत्ती किती आहे माहितीये?
advertisement
1/9

तमिळ सुपरस्टार थलापथी विजयच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्या संसारात मिठाचा खडा पडला. त्यांचा 27 वर्षांचा संसार मोडला आहे. थलपति विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिने त्याच्याकडे डिवोर्स मागितला आहे. तिने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या बातमीनं तमिळ चित्रपट आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
advertisement
2/9
विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम हिनं विजयवर एका अभिनेत्रीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले आहेत. 2012 मध्ये तिला विजयचं एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर असल्याचं कळलं होतं.
advertisement
3/9
पुढे विजयने हे नातं संपवण्याचं आश्वासन दिलं मात्र ते पुढे सुरू राहिलं आणि त्यामुळेच त्याच्या पत्नीनं डिवोर्स घेण्याचं मोठं पाऊल उचललं. मागील 2 वर्षांपासून विजय आणि संगीता वेगळे राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/9
थलापति विजय हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. सिनेमा सोडून तो काही वर्षांआधी राजकारणात गेला. त्यानंतर आता त्याच्या आयुष्यात मोठी घडमोड घडली. विजयची संपत्ती किती आहे माहितीये?
advertisement
5/9
थलापथी विजय एका सिनेमासाठी अंदाजे 100 ते 120 कोटी रुपये घेतो. तर जाहिरातींमधून दरवर्षी अंदाजे 10 कोटी कमावतो. विजयचं वार्षिक उत्पन्न 1.2 -1.4 अब्ज दरम्यान आहे.
advertisement
6/9
विजयच्या मालमत्तेबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेताकडे चेन्नईतील नीलंकारी येथे समुद्रकिनाऱ्यावरील एक आलिशान बंगला आहे. जो टॉम क्रूझच्या समुद्रकिनाऱ्यावरील घरापासून प्रेरित आहे आणि बंगालच्या उपसागराचे नेत्रदीपक दृश्य त्याच्या घरातून दिसतं.
advertisement
7/9
अहवालांनुसार, विजयकडे तिरुवल्लूर, तिरुपुरूर, तिरुमाझिसाई आणि वंदलूर येथेही मालमत्ता आहेत. विजयकडे महागडं कार कलेक्शनही आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये रोल्स-रॉइस घोस्ट, बीएमडब्ल्यू एक्स 5, बीएमडब्ल्यू एक्स 6, ऑडी ए8 एल, रेंज रोव्हर इव्होक, फोर्ड मस्टँग, व्होल्वो एक्ससी 90 आणि मर्सिडीज-बेंझ जीएलए यांचा समावेश आहे.
advertisement
8/9
विजयला ब्रँड एंडोर्समेंटसाठी मोठी मागणी आहे. जरी तो फक्त निवडक व्यवहार करतो. पण त्यासाठी मोठी रक्कम आकारतो. थलापति विजय हा तब्बल 600 कोटींचा मालक असल्याची माहिती अहवालांमधून समोर आली आहे.
advertisement
9/9
कामाच्या बाबतीत, विजयचा 23 जानेवारी 'जन नायकन' हा सिनेमा शेवटचा सिनेमा रिलीज झाला आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी हा त्याचा शेवटचा सिनेमा होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Thalapathy Vijay Net Worth: भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता! 27 वर्षांचा संसार मोडला, थलापति विजयच्या संपत्तीसमोर बॉलिवूड स्टार्सही फिके