तोळं नाही, तब्बल इतक्या किलोमध्ये बनले रश्मिका-विजयच्या लग्नाचे दागिने! 300 दिवस चाललं काम, खर्च ऐकून डोळे पांढरे होतील!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika-Vijay's wedding jewellery: २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यात दोघांच्या वेडिंग लूकने सर्वांना भुरळ घातली. पण या फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी.
advertisement
1/10

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या शाही विवाहाचे फोटो सध्या इंटरनेटवर वणव्यासारखे पसरले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यात दोघांच्या वेडिंग लूकने सर्वांना भुरळ घातली.
advertisement
2/10
पण या फोटोंमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे त्यांनी परिधान केलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी. हे दागिने केवळ त्यांच्या पेहरावाचा भाग नव्हते, तर त्यामागे १० महिन्यांची मेहनत आणि किलोने सोनं वापरण्यात आलं होतं.
advertisement
3/10
हैदराबादमधील एका नामांकित ज्वेलरी ब्रँडने या दागिन्यांची गुपिते उघड केली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे दागिने तयार करण्यासाठी तब्बल १० महिने म्हणजेच जवळपास ३०० दिवस लागले.
advertisement
4/10
प्रत्येक डिझाइन आधी कागदावर रेखाटलं गेलं, त्यानंतर त्यावर बारकाईने विचार करून कस्टमायझेशन करण्यात आलं.
advertisement
5/10
हे दागिने बनवण्यासाठी 'दीप नक्षी' आणि 'रवा' या पारंपरिक दाक्षिणात्य कलाकुसरीचा वापर करण्यात आला आहे. त्यांना अँटिक मॅट फिनिश देण्यात आला होता, जेणेकरून ते शेकडो वर्षांपासून खानदानात चालत आल्यासारखे हेरिटेज दिसावेत.
advertisement
6/10
सहसा लग्नात नवरीच्या दागिन्यांची चर्चा असते, पण इथे विजय देवरकोंडानेही आपल्या दागिन्यांनी ट्रेंड सेट केला आहे. विजयच्या दागिन्यांची थीम रॉयल होती. त्याच्या दागिन्यांवर हत्ती (बुद्धिमत्तेचे प्रतीक) आणि वाघ (चपळतेचे प्रतीक) कोरलेले होते.
advertisement
7/10
त्याने गळ्यात जड कासू माळ, कानात कडुक्कन (सोनेरी कुंडल), हातात कडे आणि कमरेला सोन्याचा पट्टा (Oddiyanam) परिधान केला होता.
advertisement
8/10
रश्मिकाला एखाद्या देवीसारखा लूक देण्यात आला होता. तिच्या दागिन्यांमध्ये एकूण ११ खास पीसेस होते. यात चोकर, मोठे झुमके, माथापट्टी, नथ, कंबरपट्टा आणि बाजूबंद यांचा समावेश होता.
advertisement
9/10
सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांच्या दागिन्यांचं वजन तोळ्यात मोजण्यापलीकडे होतं. अनेक किलो सोन्याचा वापर या भव्य ज्वेलरीसाठी करण्यात आला आहे.
advertisement
10/10
रश्मिकाच्या कोडावा साडीवर हे किलोने मोजले जाणारे दागिने तिच्या सौंदर्याला एक वेगळीच उंची देत होते. विजयच्या गळ्यातील हारांची आणि रश्मिकाच्या ११ पीसेसच्या सेटची किंमत कोटींच्या घरात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तोळं नाही, तब्बल इतक्या किलोमध्ये बनले रश्मिका-विजयच्या लग्नाचे दागिने! 300 दिवस चाललं काम, खर्च ऐकून डोळे पांढरे होतील!