TRENDING:

India vs West Indies : रिंकु सिंग OUT, संजू सॅमसन IN...वेस्ट इंडिजविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?

Last Updated:
India vs West Indies Playing XI : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 स्टेजमधील थरारक मॅच रविवारी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवली जाणार आहे.
advertisement
1/7
रिंकु सिंग OUT, संजू सॅमसन IN...वेस्ट इंडिजविरुद्ध कशी असेल टीम इंडिया?
टीम इंडिया सेमीफायनलपासून फक्त एक पाऊल लांब आहे. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन बलाढ्य टीम्स आमनेसामने येणार असून, क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
2/7
अशातच आता टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. झिम्बाब्वेविरुद्धची बॅटिंग पाहता टीम इंडिया यात कोणताही बदल करू इच्छित नाही.
advertisement
3/7
संजू सॅमसन याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. रिंकु सिंगच्या जागेवर संजू खेळेल, अशी अपेक्षा आहे. तर संजूसोबत अभिषेक शर्मा धमाकेदार ओपनिंग करेल.
advertisement
4/7
तसेच वन डाऊनला इशान किशन मैदानात उतरेल तर सूर्या, तिलक आणि दोन्ही ऑलराऊंडर्स हार्दिक आणि दुबे मिडल ओव्हर्समध्ये खेळ सांभाळतील.
advertisement
5/7
तसेच अक्षर पटेल डेथची बॅटिंगला सपोर्ट करेल. तसेच वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या दोघांच्या जोरावरच टीम इंडिया वेस्ट इंडिजला घरचा रस्ता दाखवले. तसेच कुलदीप यादवला संधी मिळते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
6/7
दरम्यान, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या जोडीचा मारा वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना सहन करावा लागणार आहे. जर कुलदीप यादवला संधी देण्याचा निर्णय घेतला गेला तर अर्शदीपला बाहेर बसावं लागू शकतं.
advertisement
7/7
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
India vs West Indies : रिंकु सिंग OUT, संजू सॅमसन IN...वेस्ट इंडिजविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल