IT मध्ये नोकरी, दिव्याने सुरू केला पार्ट-टाईम दागिन्यांचा व्यवसाय, वर्षाला लाखांत कमाई
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
तिने स्वतःची आवड बाजूला न ठेवता तिच्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. आपलं काहीतरी स्वतःचं असावं या भावनेतून तिने महाराष्ट्रीयन दागिन्यांचा पार्ट-टाईम व्यवसाय सुरू केला. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही सांभाळत ती स्वतःचा मार्ग तयार करत आहे.
advertisement
1/5

आज अनेक तरुण-तरुणी फक्त नोकरीवर न थांबता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईतील दिव्या मोहितेनेही असाच विचार केला. आयटी कंपनीत स्थिर नोकरी असतानाही तिने स्वतःची आवड बाजूला न ठेवता तिच्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. आपलं काहीतरी स्वतःचं असावं या भावनेतून तिने महाराष्ट्रीयन दागिन्यांचा पार्ट-टाईम व्यवसाय सुरू केला. नोकरी आणि व्यवसाय दोन्ही सांभाळत ती स्वतःचा मार्ग तयार करत आहे.
advertisement
2/5
दिव्याने बीएससी आयटीचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती आयटी क्षेत्रात काम करते. मात्र तिला नेहमीपासूनच दागिन्यांची आवड होती. पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने जसे नथ, ठुशी, चंद्रहार यांना आजच्या ट्रेंडनुसार थोडा वेगळा लूक देण्याचा तिचा प्रयत्न असतो. पारंपरिक आणि सध्याच्या आवडीची सांगड घालत ती ग्राहकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते.
advertisement
3/5
सकाळपासून ऑफिसची कामे पूर्ण करून घरी परतल्यानंतर दिव्या ज्वेलरीच्या कामात व्यस्त होते. डिझाईन ठरवणे, साहित्य आणणे, ऑर्डरनुसार दागिने तयार करणे, पॅकिंग करणे अशी सर्व कामे ती स्वतः पाहते. दिवस कितीही व्यस्त गेला तरी हे काम करताना तिचा थकवा कमी होतो, असे ती सांगते. वेळेचे नियोजन करून ती दोन्ही जबाबदाऱ्या नीट पार पाडते.
advertisement
4/5
दिव्या विविध प्रदर्शनं आणि एक्झिबिशनमध्ये सहभागी होत आपली ज्वेलरी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवते. ग्राहकांशी थेट संवाद साधल्यामुळे त्यांच्या आवडी-निवडी समजायला मदत होते. सोशल मीडियावरही ती नियमितपणे आपल्या डिझाईन्स शेअर करते आणि तिथूनही तिला ऑर्डर मिळतात. गेल्या वर्षभरात तिच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
advertisement
5/5
या पार्ट-टाईम व्यवसायातून दिव्याला वर्षाकाठी 3 लाखांच्यावरती उत्पन्न मिळत आहे. ही कमाई तिच्यासाठी अतिरिक्त आधार ठरत आहे. या संपूर्ण प्रवासात तिच्या कुटुंबाचा, विशेषतः आईचा, तिला मोठा पाठिंबा आहे. नोकरी सांभाळत स्वतःची आवड जोपासणारी आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन मिळवणारी दिव्या आज अनेक तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
IT मध्ये नोकरी, दिव्याने सुरू केला पार्ट-टाईम दागिन्यांचा व्यवसाय, वर्षाला लाखांत कमाई