तेजस्वी प्रकाश नुकतीच लाफ्टर शेफच्या सेटवर स्पॉट झाली. तेव्हा पापाराझींनी तिला करणच्या टॅटूविषयी विचारलं. तिच्याबरोबर भारती सिंह देखील होती. ती भारतीला म्हणाली, तू करणचा टॅटू पाहिला? भारती म्हणाली हो. तर खरा आहे का? त्यावर तेजस्वी म्हणाली, हा तो टॅटू परमनंट आहे. करण सायको आहे. तेजस्वीची ही रिअँक्शन पाहून भारतीसह पापाराझी देखील हसायला लागले.
advertisement
( OTT Film : फॅमिली-मुलं सोडा, बायकोसोबतही ओटीटीवरील या 5 फिल्म्स पाहू नका; चुकूनही पाहिलात तर... )
दरम्यान हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना करण कुंद्रानं त्या टॅटूमागचं खरं सीक्रेट सांगितलं. तो टॅटू परमनंट नाही. हा टॅटू तेजस्वीच्या पहिल्या ओटीटी शो 'सायको सैयान'च्या प्रमोशनसाठी काढण्यात आला होता. करण म्हणाला, "मी माझा सपोर्ट दाखवण्यासाठी हे केलं. तो शोच्या लाँच इव्हेंटसाठी मी तसा टॅटू काढून पोहोचलो होतो कारण शोमधील कॅरेक्टरमध्येही मुलीच्या चेहऱ्याचा टॅटू आहे. मला तिला सपोर्ट द्यावा लागेल. हा शो खूप मनोरंजक आहे आणि प्रमोशनमध्ये सहभागी होणे हा तिला सपोर्ट करण्याचा उत्तम मार्ग आहे."
तेजस्वी प्रकाश अमेझॉन एमएक्स प्लेअरवर 'सायको सैयान' या चित्रपटातून ओटीटी डेब्यू करत आहे, ज्यामध्ये रवी किशन आणि अनुद सिंग ढाका देखील आहेत. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे.
