Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबत जुळलं नाही, राखीसाठी 'बिग बॉस'नेच शोधला जोडीदार; कोण आहे तो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Wild Card Entry : बिग बॉस मराठी 6 च्या घरात चिडवाचिडवीत राखी राकेशशी फ्लर्ट करू लागली पण तिचं काही तिथं जुळलं नाही. राखी मी सिंगल म्हणून रडू लागली आणि याचं टेन्शन घेत बिग बॉसने मोठं पाऊल उचललं आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरात आयुष-तन्वी आणि करण-प्राजक्ता यांच्या जोडीची चर्चा होती. आयुष आणि करण घरातून बाहेर पडल्यावर आता राकेश आणि राखीची जोडी चर्चेत आली होती.
advertisement
2/7
घरातील सदस्य राखी आणि राकेशची जोडी जुळवू लागले. राखीनेही ही सीरिअसली घेतल्याचं दिसलं. राखी सतत राकेशच्या मागे मागे दिसली. राखी राकेशशी फ्लर्ट करू लागली. त्याने तिला भाव दिला नाही, तेव्हा तिला याचा रागही आला. राकेशने तन्वीला किस केल्यानंतर तर तिने स्वत:चे केसही कापले.
advertisement
3/7
राकेशमुळे राखी खूप दुखावली गेली. सिंगल म्हणून ती खूप रडली. इतकं की बिग बॉसलाही राखीचं टेन्शन आलं म्हणून आता बिग बॉसनेच राखीसाठी जोडीदार शोधला आहे.
advertisement
4/7
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सिंगल राखीसाठी खास सरप्राईझ असल्याचं सांगितलं आहे. रविवारी हे सरप्राईझ मिळणार असल्याचं रितेशने जाहीर केलं.
advertisement
5/7
रितेश देशमुख म्हणतो. गेल्या आठवड्यात तुम बिनचा जो शो होतो तो या आठवड्यात पूर्ण झालेला आहे. राखी सावंत बापट आहेत की तुम बिन नंतर राकेश बिन बापट आहेत, असं रितेश विचारतो. यावर राखी आणि राकेश दोघंही हसतात. नंतर रितेश म्हणतो, बिग बॉसने टेन्शन घेतलं होतं. राखी एवढ्या रडत होत्या की मी सिंगल आहे, सिंगल आहे, सिंगल आहे. त्यामुळे उद्या एक खास सरप्राइझ प्लॅन केलेलं आहे.
advertisement
6/7
दरम्यान आता हे सरप्राईम म्हणजे नेमकं काय? तर गेल्या काही दिवसांपासूनची चर्चा पाहता ही वाइल्ड कार्ड एंट्री असावी. आता राखीसाठी सरप्राईझ ठरणारा तो वाइल्ड कार्ड एंट्री सदस्य कोण याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
advertisement
7/7
दरम्यान वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून गेले काही दिवस अभिजीत बिचुकलेंचं नाव चर्चेत होतं. तर आता अभिनेत्री रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंखे यांची नावंही समोर येत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबत जुळलं नाही, राखीसाठी 'बिग बॉस'नेच शोधला जोडीदार; कोण आहे तो?