Pak vs SL : सेमी फायनलआधी मोहसीन नक्वीची सटकली, पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, कॅप्टनसह दोघांची हकालपट्टी होणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानची वर्ल्डकपमध्ये अशी बिकट अवस्था असताना तिकडे आता मोहसीन नक्वीने नवा ड्रामा सूरू केला आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तान त्यांचा ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना हा श्रीलंकेसोबत खेळणार आहे.या सामन्याला पल्लीकेलेच्या मैदानावर थोड्याच वेळात सूरूवात होणार आहे.
advertisement
2/7
दरम्यान आजच्या सामन्यात पाकिस्तानला श्रीलंकेला मोठा फरकाने हरवावे लागणार आहे. पाकिस्तान जर फलंदाजी करणार असेल तर त्यांना श्रीलंकेचा 64 हून अधिक धावांनी पराभव करावा लागणार आहे.
advertisement
3/7
आणि जर समजा श्रीलंकेने 160 धावांचे लक्ष्य ठेवले तर पाकिस्तानला ते 13.2बॉलमध्ये गाठावे लागणार आहे. तसे करून पाकिस्तान न्यूझीलंडला रनरेटमध्ये मागे टाकून सेमी फायनलला जाणार आहे.
advertisement
4/7
पाकिस्तानची वर्ल्डकपमध्ये अशी बिकट अवस्था असताना तिकडे आता मोहसीन नक्वीने नवा ड्रामा सूरू केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीबी चेअरमन मोहसीन नक्वी पाकिस्तानच्या वर्ल्डकपमधील कामगिरीवर अजिबात खूश नाही आहेत.
advertisement
5/7
कारण निवड समिती,संघ व्यवस्थापन आणि बोर्डातील त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले होते की संघ वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करेल,असे सूत्रांनी शनिवारी सांगितले.
advertisement
6/7
मोहसीन नक्वी यांनी सलमान आगाला कॅप्टन पदातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांना पाकिस्तानचा मुख्य कोच माईक हेसन आणि निवड समीतीशी चर्चा केली आहे.
advertisement
7/7
यासोबत बाबर आझम, उस्मान खान यासह इतर खेळाडू्ंच्या करीअरवर टी20 वर्ल्ड कपनंतर पुर्णविराम देण्याचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. असे जर झाल्यास पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Pak vs SL : सेमी फायनलआधी मोहसीन नक्वीची सटकली, पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, कॅप्टनसह दोघांची हकालपट्टी होणार