ठाण्यातील आनंदोत्सव कार्यक्रमात जितेंद्र सहभागी झाले होते. तेव्हा उपस्थित सगळ्यांची संवाद साधताना जितेंद्र यांनी चाळीतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "लहान लहान गोष्टींमध्ये इतकं प्रेम होतं. लहान गोष्टींचा इतका आनंद मिळायचा की मी सांगू शकत नाही. पुढे गेल्यानंतर, आयुष्य बघितल्यानंतर... आज मी 84 वर्षांचा आहे. मी नेहमी म्हणतो की मला जे प्रेम, आपुलकी तिथे मिळाली. लहान लहान वस्तूची त्यावेळेस खूप मज्जा यायची. आता इतकं काही आहे की ते पुरत नाही, मनाची शांती नाही."
advertisement
( ग्लॅमरस अभिनेत्री होणार खासदार! कोण आहे कोएल मल्लिक? जिला मिळालं राज्यसभेचं तिकीट )
"एका माणसाने मला विचारलं की, तुला ते आवडायचं मग तुला कोणी सांगितलं इथे यायला, तू तिथे परत जाऊ शकतो. सांगायचं तात्पर्य असं की, गुरूनानक जींनी सांगितलं आहे की, ज्याच्याकडे आहे तोपण दु:खी आहे. ज्याच्याकडे नाही पण दु:खी आहे. सुख आपल्या मनात आहे. आयुष्य कधीच सरळ जात नाही. जिंदगी रास्ते में न जाने कितने मोड देती हैं, हर मोड पे न जाने कितने सवाल देती है, जिंदगी भर ढुंढतेही उन सवालो का जबाब. जबाब मिलने पर सवाल देती हैं."
जितेंद्र यांनी आनंद बक्षी यांच्या दोन गाण्यांचं उदाहरण देत म्हटलं, "आनंद बक्षींनी दोन गाणी लिहिली आहेत. दोघांचा अर्थ सेम आहे. आयुष्याचं संपूर्ण सार सांगतात. 'आदमी मुसाफिर हैं, आता हैं जाता हैं, आते जाते रस्ते में यादे छोड जाता हैं'. दुसरं गाणं त्यांनी राजेश खन्नांच्या फिल्मसाठी लिहिलं होतं, 'जिंदगी के सफर में जो गुजर जाते है मकाम वो फिर न आते'."
