TRENDING:

Israel Iran Conflict: हे राम...! गांधी हॉस्पिटललाही नाही सोडलं, इस्रायलनं डागली मिसाईल, पाहा Video

Last Updated:

Israel Iran Conflict: रविवारी इस्रायली लढाऊ विमानांनी इराणची राजधानी तेहरानमधील 'गांधी हॉस्पिटल'ला लक्ष्य केले. तेहरानमधील हे महत्त्वाचे रुग्णालय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली/तेहरान: पश्चिम आशियातील तणाव आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इस्रायली लढाऊ विमानांनी इराणची राजधानी तेहरानमधील 'गांधी हॉस्पिटल'ला लक्ष्य केले. इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खमेनेई यांचा आधीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर, अमेरिका आणि इस्रायलने सुरू केलेल्या संयुक्त लष्करी मोहिमेचा हा दुसरा दिवस होता.
हे राम...! गांधी हॉस्पिटललाही नाही सोडलं, इस्रायलनं डागली मिसाईल, पाहा Video
हे राम...! गांधी हॉस्पिटललाही नाही सोडलं, इस्रायलनं डागली मिसाईल, पाहा Video
advertisement

हॉस्पिटलमध्ये ढिगारा आणि भीतीचे वातावरण

इराणच्या ISNA वृत्तसंस्थेने या हल्ल्याचे वर्णन "झिओनिस्ट-अमेरिकन एअर स्ट्राईक" असे केले आहे. काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओंमध्ये हॉस्पिटलच्या आत व्हीलचेअर्सजवळ सिमेंटचा राडरोडा आणि काचा विखुरलेल्या दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलचे मोठे नुकसान झाले असून रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

तेहरानमधील गांधी रुग्णालयावरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महात्मा गांधी मार्गावर असलेल्या या रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. रुग्णांना वाचवण्यासाठी रुग्णालयातील नर्सेस, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. व्हिडीओमध्ये लहान मुले असल्याचेही दिसून आले.

advertisement

१०० लढाऊ विमानांचा एकाच वेळी हल्ला

advertisement

दरम्यान, इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे (IDF) प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रीन यांनी सांगितले की, जवळपास १०० लढाऊ विमानांनी तेहरानमधील सरकारी ठिकाणांवर एकाच वेळी हल्ले केले. यामध्ये इराणचे हवाई दल, क्षेपणास्त्र कमान आणि अंतर्गत सुरक्षा दलांशी संबंधित इमारतींचा समावेश आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.

इराणचा पलटवार आणि प्रतिहल्ला

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

इस्रायलच्या या कारवाईला इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. इराणने इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळ, सौदी अरेबियाची राजधानी आणि दुबईच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करताना इस्रायलची राजधानी तेल अवीववरही क्षेपणास्त्र डागले. तर, लेबनॉनमधूनही हिजबुल्लाह या संघटनेने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली.

मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran Conflict: हे राम...! गांधी हॉस्पिटललाही नाही सोडलं, इस्रायलनं डागली मिसाईल, पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल