TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : गेट लॉस्ट! 'बिग बॉस'च्या घरात Entry घेताच रेवाचा रुचिताशी पंगा

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री घेताच रेवाने रुचिताला इग्नोरच्या यादीत टाकलं होतं पण घरात येताच मात्र तिने तिच्याशीच पंगा घेतला आहे.
advertisement
1/5
BBM 6 : गेट लॉस्ट! 'बिग बॉस'च्या घरात Entry घेताच रेवाचा रुचिताशी पंगा
बिग बॉस मराठी 6 च्या घरात एकाच वेळी 3 वाइल्ड कार्ड एंट्री म्हणजे जणू प्रलयचा आला आहे. बिग बॉसच्या घरात रेवा कौरासे, संस्कृती साळुंके, संकेत पाठक हे तीन नवीन स्पर्धक आले आहेत. त्यांना पाहूनच बिग बॉसच्या घरातील जुन्या सदस्यांना धक्का बसला आहे. एंट्री घेताच नव्या सदस्यांनी खेळ खेळायला सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरात येताच रेवाने रुचिताशी पंगा घेतला आहे.
advertisement
2/5
रेवा आणि रुचिता दोघी भांडताना दिसल्या. रेवा म्हणते, "असं झालंय की रुचिताला आवाज नाही ऐकायचा आहे". यावर रुचिता म्हणते, "पण मी तुला विचारलंच नाही आहे, आली मोठी शहाणी"
advertisement
3/5
रेवा रुचिताला तिच्या दिसण्यावरूनही आणि ड्रेसिंगवरूनही टोमणा मारते. ती म्हणते, "हे सगळं करून छान दिसतेस". यावर रुचिता म्हणते, "मी छान दिसते, वाईट दिसते मला त्याच्यासाठी काही देणंघेणं नाही" "तुला मी सांगतच नाहीये", असं म्हणत रेवा रुचिताचा हात धरायला जाते. तेव्हा रुचिता तिला म्हणते डोंट टच मी डोंट टच मी गेट लॉस्ट म्हणते.
advertisement
4/5
आश्चर्य म्हणजे वाइल्ड कार्ड एंट्री होताच नव्या सदस्यांना टॉप, फ्लॉप सदस्य, आणि कोणत्या सदस्याला इग्नोर करणार आणि कोणत्या सदस्याला टार्गेट ते सांगायचं होचं. तेव्हा रेवाने विशालला टार्गेट केलं आणि रुचिताला इग्नोर केलं होतं. रुचिताचा गेम, तिचं बोलणं पटत नाही. ती काहीही बोलते, तिच्याशी बोलणं म्हणजे स्वत:वर संकट ओढवून घेणं आहे, असं रेवा म्हणाली होती. पण घरात येताच तिने सगळ्यात आधी रुचिताशी पंगा घेतल्याचं दिसलं. 
advertisement
5/5
दरम्यान तिघांचीही एंट्री मुख्य दरवाजातून नाही तर शॉर्ट कर्ट मधून झाली. त्यांना पॉवर की आणि थेट कॅप्टन्सीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच बिग बॉसच्या घराचं रुपांत बीबी हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे आणि नवीन सदस्य हॉटेलचे व्हीव्हीआयपी गेस्ट आणि घरातील सदस्यांपैकी दोघांना पहारेकरी आणि दोघांना सेवक बनवण्यात आलं आहे. पहारेकरी म्हणून रुचिता आणि सागर तर सेवक म्हणून विशाल आणि तन्वी यांची नव्या सदस्यांनी निवड केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : गेट लॉस्ट! 'बिग बॉस'च्या घरात Entry घेताच रेवाचा रुचिताशी पंगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल