श्रीखंडाची ही खास रेसिपी prasika_official या अकाउंटवर शेअर केली गेली आहे. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि विशेष म्हणजे जी मूळ दही खायला नाकं मुरडतात, तीच हे श्रीखंड आवडीने खातील. चला तर मग पाहूया हे स्ट्रॉबेरी श्रीखंड कसे बनवायचे.
स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- स्ट्रॉबेरी
- बेकिंग पावडर
advertisement
- व्हिनेगर
- दही
- साखर
स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवण्याची कृती
- सर्वात आधी स्ट्रॉबेरी पाण्यात टाका त्यामध्ये बेकिंग पावडर आणि व्हिनेगर टाकून काहीवेळ तसेच ठेवा.
- आता दही घ्या. ते एका सुती किंवा मलमलच्या कापडात टाका.
- आता या दह्याचे पाणी घालण्यासाठी ते कापडासकट गाळणीमध्ये ठेवा आणि त्यावर वरून काहीतरी वजन ठेवा.
- दही सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. या प्रक्रियेमुळे साध्या दह्याचे घट्ट आणि पनीरसारखे दही तयार होते.
- आता स्ट्रॉबेरी पाण्यातून काढा आणि व्यवस्थित स्वच्छ करा. ते कोरड्या कापडाने पुसून कोरडे घ्या.
- त्यानंतर स्ट्रॉबेरी कापून तिचे तुकडे करा.
- गॅसवर एक पण ठेवा. त्यामध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि थोडी साखर टाका.
- हे मिश्रण थोडावेळ शिजवून घ्या. याची थोडी पातळ आणि बारीक पेस्ट तयार होईल.
- मिश्रण तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा.
- आता फ्रिजमधून दही काढा आणि हे घट्ट झालेले दही व्हिस्करने फेटून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये स्ट्रॉबेरीची पेस्ट टाका आणि तीही व्हिस्करने फेटून हे दिनही व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- अशाप्रकारे तुमचे स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
