'बिग बॉस मराठी'च्या घरात 'वाईल्ड कार्ड'चा धमाका! मराठी मालिका विश्वातील चॉकलेट बॉय घराचं तापमान वाढवणार, कोण आहे तो?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Wild Card: आज रात्रीच्या भागात घरात एक-दोन नव्हे, तर चक्क ३ नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.
advertisement
1/8

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. 'भाऊचा धक्का' आणि रितेश देशमुखचा कडक अंदाज यामुळे या शोची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. ५० दिवसांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता हा खेळ अधिकच रंगतदार वळणावर आला आहे.
advertisement
2/8
नुकताच 'विदर्भचा वाघ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोशन भजनकरचा प्रवास संपला असला, तरी प्रेक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज रात्रीच्या भागात घरात एक-दोन नव्हे, तर चक्क ३ नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.
advertisement
3/8
या तिघांमधील सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे अभिनेता संकेत पाठक. 'छत्रीवाली' आणि 'लग्नाची बेडी' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला संकेत आता बिग बॉसच्या घरात आपली रणनीती खेळताना दिसणार आहे.
advertisement
4/8
संकेतने नुकतंच 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलं आहे.
advertisement
5/8
संयमी आणि हुशार खेळाडू म्हणून ओळखला जाणारा संकेत घरातल्या ग्रुपबाजीला कसं उत्तर देतो, हे पाहणं रंजक ठरेल. संकेतसोबतच दोन ग्लॅमरस अभिनेत्री घराचं तापमान वाढवण्यासाठी सज्ज आहेत.
advertisement
6/8
हिंदी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरा असलेली रेवा आता मराठी बिग बॉसमध्ये नशीब आजमावणार आहे. तिने अर्जुन बिजलानीसोबत 'शिव शक्ती' आणि 'दीवानियत' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तिची स्टाईल आणि स्पष्टवक्तेपणा घरातील इतर महिला स्पर्धकांना नक्कीच कडवी टक्कर देईल.
advertisement
7/8
'जाऊ बाई गावात' या शोमधून प्रसिद्ध झालेली आणि सोशल मीडियावर 'पापा की परी' म्हणून ओळखली जाणारी संस्कृती साळुंखे तिसरी वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे. तिची बडबड आणि निरागसता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुरेशी आहे.
advertisement
8/8
गेल्या महिन्यात राखी सावंतने वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेऊन घरात धुमाकूळ घातला होता. आता या तिघांच्या येण्याने राखीच्या सत्तेला आव्हान मिळणार का? की हे नवीन सदस्य राखीसोबत हातमिळवणी करणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. ५० दिवसांनंतर घरातील समीकरणं पूर्णपणे विस्कळीत झाली असताना, या तीन 'वाईल्ड कार्ड' मुळे खेळाला एक नवीन दिशा मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बिग बॉस मराठी'च्या घरात 'वाईल्ड कार्ड'चा धमाका! मराठी मालिका विश्वातील चॉकलेट बॉय घराचं तापमान वाढवणार, कोण आहे तो?