Watermelon in Fridge : कापलेलं कलिंगड फ्रिजमध्ये ठेवून खाण्याची सवय आहे? मग ही बातमी वाचा, यानंतर पुन्हा कधीही असं खाणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
watermelon in fridge poisonous : कलिंगड खाल्यानंतर उरलेले तुकडे फ्रिजमध्ये ठेवतो जे कधी एक-दोन दिवस तर कधी आठवडा-पंधरा दिवस फ्रिजमध्येच असतात. दे आपण काढून खातो किंवा मुलांना खायला देतो. तुम्ही ही असंच करत असाल तर सावधान! तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
advertisement
1/9

उन्हाळा सुरू झाला की बाजारात लालचुटूक कलिंगड दिसू लागतात. उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण कलिंगड आणतात, ते कापतात आणि थंड व्हावे म्हणून तासनतास फ्रिजमध्ये ठेवतात किंवा कलिंगड खाल्यानंतर उरलेले तुकडे फ्रिजमध्ये ठेवतो जे कधी एक-दोन दिवस तर कधी आठवडा-पंधरा दिवस फ्रिजमध्येच असतात. दे आपण काढून खातो किंवा मुलांना खायला देतो. तुम्ही ही असंच करत असाल तर सावधान! तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
advertisement
2/9
हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्ही कापलेलं कलिंगड फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी दहावेळा विचार कराल.
advertisement
3/9
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कलिंगड हे सर्वोत्तम फळ मानले जाते. मात्र, घाईघाईत किंवा नंतर खाण्यासाठी कलिंगड कापून फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय अनेकांना असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही साधी वाटणारी सवय 'फूड पॉयझनिंग'ला निमंत्रण देऊ शकते.
advertisement
4/9
1. 'बॅक्टेरिया'चा वाढता धोका (Listeria Risk)कलिंगड हे जमिनीवर वाढणारे फळ आहे. त्याच्या सालीवर अनेक प्रकारचे जीवाणू असतात. जेव्हा आपण कलिंगड कापतो, तेव्हा चाकूद्वारे हे बॅक्टेरिया गरापर्यंत पोहोचतात. कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावर 'लिस्टेरिया' (Listeria) नावाचे बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे जुलाब आणि उलट्यांचा त्रास होतो.
advertisement
5/9
2. पोषक तत्वे नष्ट होतातएका संशोधनानुसार (USDA), कलिंगड रूम टेम्परेचरवर (खोलीच्या तापमानावर) ठेवल्यास त्यातील 'लायकोपीन' (Lycopene) आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स वाढतात. मात्र, ते कापून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक तत्वे हळूहळू कमी होऊ लागतात आणि फळाची नैसर्गिक चवही बिघडते.
advertisement
6/9
3. फ्रिजमधील इतर पदार्थांचा वास - कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण ९२% असते. ते उघडे कापून ठेवल्यास फ्रिजमधील इतर मसाल्यांचा किंवा पदार्थांचा वास ते शोषून घेते. यामुळे फळ लवकर खराब होते आणि खाण्यास अयोग्य ठरते.
advertisement
7/9
कलिंगड खाताना 'या' चुका टाळाकापून फ्रिजमध्ये ठेवणेखाण्यापूर्वी संपूर्ण कलिंगड थंड पाण्यात किंवा काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा, मगच कापा.कलिंगड कापल्यानंतर 1-2 तासांच्या आत कलिंगड संपवावे. रात्रभर ठेवलेले कापलेले फळ टाळावे.फ्रिजमध्ये ठेवायचेच असल्यास वरची साल काढून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवावे.
advertisement
8/9
आरोग्य तज्ज्ञांचा सल्लाकलिंगड कापल्यानंतर ते जास्तीत जास्त 30 मिनिटे ते 1 तासाच्या आत खाणे उत्तम असते. जर तुम्हाला ते थंड हवे असेल, तर कापण्यापूर्वीच संपूर्ण फळ अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. कापलेल्या कलिंगडावर कधीही मीठ किंवा साखर घालून जास्त वेळ ठेवू नका, कारण यामुळे त्याला पाणी सुटते आणि ते लवकर खराब होते.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Watermelon in Fridge : कापलेलं कलिंगड फ्रिजमध्ये ठेवून खाण्याची सवय आहे? मग ही बातमी वाचा, यानंतर पुन्हा कधीही असं खाणार नाही