गुड न्यूज! पनवेल ते कर्जत प्रवास आता सुसाट; बहुप्रतीक्षित लोकल सेवा सुरू होणार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अनेक वर्षांपासून पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती.जानेवारी २०२१मध्ये या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली.
advertisement
1/7

पनवेलहून कर्जतला थेट लोकल ट्रेननं प्रवास करता येणार आहे. बहुप्रतीक्षीत पनवेल - कर्जत लोकल लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची मोठी सोय होणार आहे
advertisement
2/7
पनवेल आणि कर्जत.... मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरची ही दोन टोकाची रेल्वे स्थानकं.. आता या स्थानकादरम्यान लोकल सेवा सुरु होणार आहे.
advertisement
3/7
मध्य रेल्वेवर हा नवीन उपनगरी रेल्वे कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. मुंबई रेल विकास महामंडळाकडून हा मार्ग तयार केला जात आहे. या मार्गावर सर्वात लांब बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे.
advertisement
4/7
पनवेल–कर्जत उपनगरी रेल्वेमार्गाची लांबी29.6 किमी आहे. त्यामध्ये 3 बोगदे आणि 47 पूलांची निर्मिती करण्यात आली आहे.
advertisement
5/7
या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे (मोहोपे), चौक आणि कर्जत ही स्थानके आहेत.
advertisement
6/7
अनेक वर्षांपासून पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती.जानेवारी २०२१मध्ये या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली.
advertisement
7/7
सध्या काही ठिकाणी रेल्वे रुळ अंथरणे ,सिग्नल, इंटरलॉकिंग प्रणाली आणि विद्युत यंत्रणेची उभारणी वेगानं केली जात आहे. तसेच रेल्वे स्थानकांच्या इमारतीची अंतिम कामे अंतिम टप्प्यात आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
गुड न्यूज! पनवेल ते कर्जत प्रवास आता सुसाट; बहुप्रतीक्षित लोकल सेवा सुरू होणार