Weather Alert : पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, होळीला बसणार उन्हाचा तडाखा, IMD चा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मार्च महिन्यात कमाल तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता असली तरी, पुढील काही दिवसांत तापमान वाढेल. कोकणात दमट उकाडा तर मराठवाडा आणि विदर्भात तीव्र उन्हाचा तडाखा जाणवेल.
advertisement
1/7

महाराष्ट्रात 2 मार्च होळीच्या दिवशी उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात कमाल तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता असली तरी, पुढील काही दिवसांत तापमान वाढेल. कोकणात दमट उकाडा तर मराठवाडा आणि विदर्भात तीव्र उन्हाचा तडाखा जाणवेल.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दमट आणि उष्ण हवामान राहील. मुंबईत कमाल 29-32 अंश सेल्सिअस, किमान 23-25 अंश अपेक्षित आहे. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. समुद्रकिनाऱ्यावर मध्यम वारे राहील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोरडे आणि उष्ण राहील. पुण्यात कमाल 31-34 अंश, किमान 15-18 अंश तापमान राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ होईल. नाशिकमध्ये दिवसा 32-35 अंश, रात्री 17-20 अंश तापमान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल 33-36 अंशांपर्यंत, किमान 18-21 अंश राहील.
advertisement
6/7
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. कमाल 34-36 अंश, किमान 20-23 अंश राहील.
advertisement
7/7
एकंदरीत, 2 मार्चला महाराष्ट्रात उष्णता जाणवेल. नागरिकांनी भरपूर द्रवपदार्थ घ्या, सूर्यप्रकाश टाळा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, होळीला बसणार उन्हाचा तडाखा, IMD चा अलर्ट