T20 वर्ल्ड कपच्या चारही सेमी फायनलिस्ट ठरल्या, टीम इंडियाचा सामना कधी, कुठे होणार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
advertisement
1/6

वेस्ट इंडिजने दिलेलं 196 रनचं आव्हान टीम इंडियाने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातलं टीम इंडियाने यशस्वीरित्या पार केलेलं हे पहिलंच एवढं मोठं आव्हान होतं. संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
advertisement
2/6
संजूने 50 बॉलमध्ये 194 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 97 रन केले, ज्यात 12 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. याशिवाय तिलक वर्माने 15 बॉल 27 रनची महत्त्वाची खेळी करून टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
advertisement
3/6
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या विजयासोबतच टीम इंडियाने त्यांचे सेमी फायनलचं तिकीटही निश्चित केलं आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियासह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार टीम पोहोचल्या आहेत.
advertisement
4/6
टी-20 वर्ल्ड कपची पहिली सेमी फायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. बुधवार 4 मार्चला कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना रंगेल.
advertisement
5/6
टीम इंडिया त्यांची सेमी फायनल इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल गुरूवार 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. इंग्लंडने या वर्ल्ड कपमधल्या सगळ्या मॅच जिंकल्या आहेत, तर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव वगळता उरलेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
advertisement
6/6
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या सेमी फायनलमध्ये ज्या 2 टीमचा विजय होईल, त्या फायनलमध्ये भिडतील. रविवार 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपच्या चारही सेमी फायनलिस्ट ठरल्या, टीम इंडियाचा सामना कधी, कुठे होणार?