TRENDING:

T20 World Cup : एकाला बाहेर बसवलं, दुसऱ्याचं डिमोशन, गंभीर-सूर्याच्या शॉकिंग ट्रिटमेंटने टीम इंडिया सेमी फायनलला!

Last Updated:
वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं.
advertisement
1/7
एकाला बसवलं, दुसऱ्याचं डिमोशन, गंभीरच्या शॉकिंग ट्रिटमेंटने टीम सेमी फायनलला!
संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजू सॅमसनने 50 बॉलमध्ये 194 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 97 रनची खेळी केली. संजूच्या या खेळीमध्ये 12 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. या कामगिरीबद्दल संजूला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
2/7
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. तसंच संजू सॅमसनच्या नाबाद 97 रन या टी-20 वर्ल्ड कप इतिहासातली भारतीय खेळाडूची सर्वोत्तम खेळी केली.
advertisement
3/7
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या विजयासोबतच टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचली आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होईल. गुरूवार 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा हाय व्होल्टेज सामना रंगेल.
advertisement
4/7
खरंतर संजू सॅमसन हा वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा ओपनर नव्हता. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये संजू बेंचवर बसून होता, पण अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंगच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागले आणि संजूची एन्ट्री झाली.
advertisement
5/7
टीम इंडियाने फक्त टीममध्येच बदल केले नाहीत, तर बॅटिंग ऑर्डरही बदलली. सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये संघर्ष करणाऱ्या तिलक वर्माला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं गेलं.
advertisement
6/7
तिलक वर्माच्या या डिमोशनचा फायदा टीम इंडियाला झाला. झिम्बाब्वेविरुद्ध तिलकने 16 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले, तर वेस्ट इंडिजविरुद्ध मॅच फसलेली असताना तिलकने 15 बॉलमध्ये महत्त्वाच्या 27 रन करून भारताला विजयाच्या जवळ नेलं.
advertisement
7/7
कोच गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संजूला बाहेर ठेवलं आणि तिलकचं बॅटिंग ऑर्डरमध्ये डिमोशन केलं, पण या दोघांनीच भारताला आणखी एका टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : एकाला बाहेर बसवलं, दुसऱ्याचं डिमोशन, गंभीर-सूर्याच्या शॉकिंग ट्रिटमेंटने टीम इंडिया सेमी फायनलला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल