वडिलांना वाचवण्यासाठी 2 लाखांचं कर्ज; पण नियतीचा घाव… आईचाही मृत्यू, 2 मुलं पोरकी, असं काय घडलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे, जिथे वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी कुटुंबाने 2 लाख रुपयांचे कर्ज काढून एक मोठा निर्णय घेतला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. ज्या प्रवासातून वडील सुखरूप परत येतील अशी आशा होती, त्याच प्रवासाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केलं.
advertisement
1/7

आयुष्यात संकटं सांगून येत नाहीत, पण कधीकधी एका संकटातून सावरण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्नच जीवावर बेततो तेव्हा नियतीवरचा विश्वास उडतो. आपल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी माणूस काय करू शकतो? तो आपली जमीन जुमला विकायला तयार होतो, मित्र-नातेवाईकांकडे हात पसरतो आणि प्रसंगी लाखो रुपयांचं कर्जही काढतो. हे सर्व कशासाठी? तर फक्त आपल्या माणसाला 'दुसरं आयुष्य' मिळावं म्हणून.
advertisement
2/7
पण या सगळ्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे, जिथे वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी कुटुंबाने 8 लाख रुपयांचे कर्ज काढून एक मोठा निर्णय घेतला. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. ज्या प्रवासातून वडील सुखरूप परत येतील अशी आशा होती, त्याच प्रवासाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केलं.
advertisement
3/7
हे कुटुंब मूळचं झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील. 41 वर्षीय संजय हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक हॉटेल चालवत असत. साधारण आठवड्याभरापूर्वी हॉटेलमध्ये जेवण बनवत असताना अचानक गॅस गळती झाली आणि भीषण आग लागली. या आगीत संजय गंभीररीत्या भाजले गेले. स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते, पण प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला.
advertisement
4/7
संजय यांची प्रकृती चिंताजनक होती. साध्या रुग्णवाहिकेने दिल्लीपर्यंतचा प्रवास करणं शक्य नव्हतं, म्हणून 'एअर ॲम्ब्युलन्स' (विमान रुग्णवाहिका) ठरवण्यात आली. यासाठी तब्बल 8 लाख रुपयांचा खर्च येणार होता. आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसायात मंदी असताना इतकी मोठी रक्कम उभी करणं कठीण होतं. तरीही, संजय यांच्या भावाने आणि नातेवाईकांनी हार मानली नाही. त्यांनी काही पैसे स्वतःच्या बचतीतून काढले, तर तब्बल 2 लाख रुपयांचे कर्ज आणि मित्रांकडून उसने पैसे घेऊन 8 लाखांची जुळवाजुळव केली.
advertisement
5/7
सोमवारी संध्याकाळी संजय यांना घेऊन एअर ॲम्ब्युलन्सने रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण केलं. संजय यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना देवी आणि त्यांचा तरुण पुतण्या ध्रुव कुमारही सोबत होते. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात उपचार झाले की संजय पुन्हा आपल्या पायावर उभे राहतील, अशी आशा घरच्यांना होती. पण विमान हवेत झेपावल्यानंतर काही वेळातच झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कर्मातांड जंगलात या एअर ॲम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील दोन पायलट, डॉक्टर आणि पॅरामेडिक कर्मचाऱ्यांसह संजय, त्यांची पत्नी आणि पुतण्या अशा सातही जणांचा मृत्यू झाला.
advertisement
6/7
संजय यांच्या कुटुंबावर हा दुसरा मोठा आघात आहे. 2004 मध्ये त्यांच्या वडिलांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्या धक्क्यातून सावरत संजय यांनी मेहनतीने पुन्हा संसार उभा केला होता. पण आता एका रात्रीत 13 वर्षांचा शिवम आणि 17 वर्षांचा शुभम ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. आई आणि वडील दोघांचाही सावली एकाच वेळी हरपल्याने संपूर्ण ही मुलं आता पोरकी झाली आहेत.
advertisement
7/7
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर ॲम्ब्युलन्सच्या शुल्कात 2 लाख रुपये कमी पडत असल्याने विमानाला उशीर झाला होता. "आम्ही पैसे गोळा करण्यासाठी धडपडलो, आम्हाला वाटलं दिल्लीतील उपचार त्यांना नवजीवन देतील. पण आम्हाला काय माहीत होतं की आम्ही त्यांच्या मृत्यूच्या प्रवासासाठी पैसे भरतोय," अशा शब्दांत नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
वडिलांना वाचवण्यासाठी 2 लाखांचं कर्ज; पण नियतीचा घाव… आईचाही मृत्यू, 2 मुलं पोरकी, असं काय घडलं?